Ramdas Athawale  Sarkarnama
मुंबई

वाईन विक्रीच्या धोरणावर आठवले म्हणाले, किराणा दुकानात आला दारूचा माल...

राज्य सरकारने वाईन (Wine) सुपरमार्केटमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्य सरकारने वाईन (Wine) सुपरमार्केटमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात भाजपने जोरदार मोहीम सुरू केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप (BJP) सर्वच नेत्यांनी या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी या वादात उडी घेतली असून, थेट यावर कविताच सुनावली आहे.

राज्य सरकारने वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एक हजार चौरस फूटापेक्षा मोठ्या दुकानांत शोकेस निर्माण करून वाईन विकता येईल. ही वाईन सध्या बार किंवा मद्याच्या दुकानांतच मिळते. ती आता सुपर मार्केटमध्येही मिळू शकेल. सरकारच्या या धोरणावर विरोधक तुटून पडले आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी राजभवनातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारच्या वाईन विक्रीच्या नव्या धोरणाचा समाचार घेतला. त्यांनी यावर कवितेच्या माध्यमातून निशाणा साधला. किराणा दुकानात आला दारूचा माल..लोकांचे होणार हाल, अशी कविताच त्यांनी ऐकवली. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पक्ष आंदोलन करेल, अशा इशाराही आठवले यांनी दिला.

दरम्यान, वाईन विक्रीवरुन फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले होते. पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, असा टोला त्यांनी लगावला होता. ते म्हणाले होते की, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी! महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू! महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच! महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या 'नशे'त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT