Uorfi Javed | Chitra Wagh | Rupali Chakankar Sarkarnama
मुंबई

Uorfi Javed : उर्फीने भेट घेतल्यानंतर काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?

Uorfi Javed : या प्रश्नावर आयोगाचा वेळ घालवावा, अशी ही बाब नाहीये.

सरकारनामा ब्यूरो

Uorfi Javed : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री ऊर्फी जावेदमधला वाद विकोपाला पोहचला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सातत्याने टार्गेट केल्यानंतर उर्फीनेही वाघ यांच्यावर वारंवार पलटवार केला होता.आता या वाद वेगळ्या वळणावर पोहचला आहे. उर्फीने आता थेट राज्य महिला आयोगाचे दार ठोठावले आहे. अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची उर्फीने भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे. यानंतर चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

चाकणकर म्हणाल्या, "भारतीय संविधानाने व्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. यामुळे कोणी काय घालायचं, काय घालायचं नाही, कुठे जायचं, काय बोलायचं हा व्यक्तिगत प्रश्न आहे. हा प्रत्येक व्यक्तिला अधिकार देण्यात आलेला आहे. यामध्ये कोणाही हस्तक्षेप करू नये आणि कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे."

उर्फीने महिला आयोगाच्या भेटीवर चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न पडले आहेत. ते सोडवण्याचा आयोग प्रयत्न करतोय. इतरही अनेक प्रश्न आहेत. सद्या निर्माण केला जाणाऱ्या प्रश्नावर आयोगाचा वेळ घालवावा, अशी ही बाब नाहीये. तरीसुद्धा उर्फी जावेदने आयोगामध्ये येऊन भेट घेतली. उर्फी यांना ज्यांनी कोणी धमकी दिली असेल, यानंतरत्यांना जीवाला धोका वाटतोय किंवा अशा पद्धतीने त्यांना सातत्याने बोललं जातंय, यामुळे त्यांनी असुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली. यामुळे त्यांना संरक्षण मिळावं, याप्रकारच्या धमकीतून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासंबंधी दखल घेऊन पोलिसांनी यावर कार्यवाही करावी, अशी मागणी उर्फी जावेदने केली," असे चाकणकर म्हणाले.

दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री ऊर्फी जावेदमधला वाद विकोपाला पोहचला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सातत्याने टार्गेट केल्यानंतर उर्फीनेही राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali-Chakankar) यांची भेट घेऊन त्यांनी आपल्याला येत असलेलल्या धमक्यांबाबत व्यथा आयोगासमोर मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT