Urfi Javed and Chitra Wagh : उर्फी जावेदच्या प्रकरणावरून चित्रा वाघ बॅक फुटवर?

Urfi Javed and Chitra Wagh : उर्फी जावेदच्या प्रकरणावरून चित्रा वाघ एकाकी पडल्याची चर्चा
Urfi Javed and Chitra Wagh
Urfi Javed and Chitra WaghSarkarnama
Published on
Updated on

Urfi Javed and Chitra Wagh : आपल्या वेगवेगळ्या पेहरावामुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद पेटला आहे. उर्फीच्या पेहरावावर वाघ यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर चित्रा वाघ विरुद्ध उर्फी जावेद असा वाद सुरू झाला.

आता उर्फी जावेद रोज वेगवेगळे ट्विट करून चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. याच वादावर बोलताना अमृता फडणवीस यांनी एक प्रकारे उर्फीची बाजू घेत ''उर्फि एक स्त्री असून त्या काहीही वावगं करत नाहीत'', असा निर्वाळा दिला. त्यामुळे या वादावरून चित्रा वाघ या एकाकी पडल्यात का? अशी चर्चा सुरू झालीय.

Urfi Javed and Chitra Wagh
Nanded : न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली ; अन् जागेवरच सहा महिन्यांची शिक्षा

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फीचा नंगानाच खपवून घेणार नाही, असं सांगितलं होतं. तर त्यांना प्रतिउत्तर देताना उर्फीने ''माझा नंगानाच सुरुच राहणार'', असं म्हटलं होतं. त्यामुळे हा वाद आता अधिक वाढणार की मिटणार? हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?

'प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार आहेत त्या नुसार त्या अॅक्शनही घेत आहेत. पण माझा विचार असा आहे, एक स्त्री म्हणून मला असे वाटते की, ती स्वत:साठीच काहीतरी करते आहे त्यामुळे मला त्यात काही वावगं वाटत नाही'', असं अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या होत्या.

Urfi Javed and Chitra Wagh
Ajit Pawar News : राज्यात एकही पक्ष स्वबळावर लढू शकत नाही..

अमृता फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया देत एक प्रकारे उर्फीची बाजूच घेतल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे पक्षाच्यावतीनेही चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादावर कोणीही काही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे आता चित्रा वाघ या एकाकी पडल्या असल्याची चर्चा होत आहे.

उर्फीने केलेले ट्विट काय आहेत?

-उर्फी एका ट्विटमध्ये म्हणतेय की, ''उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तु गं सास''.

-उर्फी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणते की, ''मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू''.

-उर्फी तिसऱ्या ट्विटमध्ये म्हणते की, ''चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर मे होने वाली सास है''.

Urfi Javed and Chitra Wagh
Phaltan : दिंगबर आगवणेंसह सात जणांवर मोक्काची कारवाई

दरम्यान, उर्फी जावेदने आत्तापर्यंत अनेक ट्विट केले असून त्यामध्ये सातत्याने चित्रा वाघ यांना सासू म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तसेच हा वाद उर्फी इन्जॉय करत असल्याचं चित्र आहे. तर चित्रा वाघ यांनी सुरुवातीला यावर प्रतिक्रिया दिली. मात्र आता उर्फीने ज्या पद्धतीने चित्रा वाघ यांना उत्तर द्यायला सुरू केलंय त्यामुळे चित्रा वाघ (Chitra Wagh) या बॅक फुटवर गेल्यात का? अशी चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com