Ashish Shelar News, Ashish Shelar on NCP, Latest Political News in Marathi 
मुंबई

मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर डोळा, मनसेला राष्ट्रवादीचे पाठबळ: आशिष शेलारांचा दावा

NCP| MNS| BJP| Politics| मनसेबाबत वेगळी चर्चा कानावर येत आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मशिदींवरील भोंगे विरूद्ध हनुमान चालिसा आणि हिंदूत्त्वाच्य मुद्द्यावरुन राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. असे असताना भाजप नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप (BJP) आपला कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप शेलार यांनी फेटाळून लावला. याच वेळी त्यांनी राज्यातील या घडामोडींमागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (NCP) डाव असल्याचा दावा केला आहे.

मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसावरून भाजप मनसेला पुढे केला जात असला तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी वाटते. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या लालसेपोटी राष्ट्रवादी काँग्रेस मनसेचा वापर करून शिवसेनेची अडचण करत असावी, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. भाजप हा हिंदूत्वाच्या विचारांचा पक्ष असला तरी हनुमान चालिसा हा भाजपचा कार्यक्रम नाही. पण हनुमान चालीसाच्या पठणाला कोणी विरोध करत असेल, तर त्याला भाजपचा विरोध असेल.

आम्ही कोणत्याही जाती धर्मावर सक्ती केली नाही. राम मंदिर, रामसेतू, ३७०, नागरिकत्व सुधारणा कायदा या मुद्दय़ांवर भाजपने नेहमीच स्वत: ची स्पष्ट भूमिका मांडली आहे. भूमिका मांडण्यासाठी आम्हाला इत कोणालाही पुढे करण्याची गरज नाही, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. पण सर्वधर्म समभावाच्या नावाखाली हिंदूंवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मनसेच्या सर्व सभांना परवानगी दिली जाते. मनसेबाबत वेगळी चर्चा कानावर येत आहे. कदाचित राष्ट्रवादीच मनसेचा वापर करून घेत असावी. मनसेला पुढे करून राष्ट्रवादी शिवसेनेची अडचण करीत असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे मतही शेलार यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT