मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची (MNS Cheif Raj Thackeray) येत्या 1 मे (Maharashtra Din) औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनीहीदेखील राज यांच्या सभेला परवानगी देणार असल्याचे जाहीर केलं आहे.
विशेष म्हणजे मनसेने या सभेची जोरदार तयारीही सुरु केली आहे. सभेची तयारी जोरात सुरु असून घरोघरी जाऊन निमंत्रण दिलं जातं आहे. काही हिंदू संघटनांना निमंत्रण देण्यात आले असून त्यांचा उत्फुर्त असा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसे कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत. सभेच्या परवानगीचे पत्र अजून आमच्या हातात पत्र मिळालेलं नाही. पण, सभा ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणीच होईल. पाडव्याच्या सभेनंतर राज्याचं राजकारण बदललं आहे. राज ठाकरे यांच भाषण पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नाही. पण भोंगे हा सामाजिक विषय आहे, ज्याचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा, असेही संदिप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे म्हणतात की, 2005 च्या न्यायालयाच्या नियमांचं पालन व्हायला हवं, मग जो माणूस कायद्याचं सांगतो तो बंधुभाव कसा बिघडवेल, त्यामुळे शरद पवार जे काल इफ्तार पार्टीत बोलले ते तिथे बसलेल्या लोकांसाठी असावं, असा टोलाही देशपांडे यांनी लगावला. याचवेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी देखील जोरदार सुरूच असल्याचंही त्यांनी सांगितलंं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.