Mumbai News : हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपू्र्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं.अखेर बुधवारी लागलेल्या निकालामध्ये हरियाणात जनतेनं भाजपला बहुमतानं तिसऱ्यांदा सत्तेत बसवलं.
तर दुसरीकडे काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला. सत्तेत परतण्याचं काँग्रेससह राहुल गांधींचंही स्वप्नं धुळीस मिळालं. या पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसच्या पराभवावर नेमकं भाष्य करत गंभीर आरोप केला आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) प्रतिक्रिया देण्यात आली आहे. वंचितकडून सोशल मीडियावरील X माध्यमावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. दलित मुलीचा अपमान केल्यानेच हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याचं वंचितनं म्हटलं आहे.
हरियाणात काँग्रेसच्या (Congress) पराभवाचे खरे कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तर ते दलित मुलीचा अपमान आहे.कुमारी शैलजा यांचा अपमान आहे. यामुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. हरियाणातील दलितांनी जातीयवादी काँग्रेसने त्यांचा कसा अपमान केला हे पाहिले.त्यांच्या पक्षातील कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही.
काँग्रेसने त्यांना निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवल्याचेही वंचित बहुजन आघाडीने आरोप केला आहे. हरियाणातील दलितांनी आपल्याच मुलीचा झालेला अपमान पाहिला आणि दलित मुलीचा अपमान त्यांना सहन झाला नाही. दलितांनी सूड घेतला आणि काँग्रेसचा पराभव केला असा दावाही वंचितनं आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
कालपर्यंत हरियाणात काँग्रेसच विजयी होणार असल्याचं बोललं जात होतं,असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला होता. शिवाय विविध एक्झिट पोल्सनी देखील हरियाणामधील जनता काँग्रेस पक्षाला कौल देणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.
मात्र, तो अंदाज सपशेल फोल ठरला. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजप या राज्यात एकहाती सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.