Fadnavis Vs Deshmukh : आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये भांडणे लावणारा कामगार कल्याण मंडळाचा 'तो' अधिकारी कोण?

Anil Deshmukh criticized Devendra Fadnavis : महाविकास आघाडी आणि महायुतीची सत्ता असतानाही त्यांना हात लावण्याची एकाही नेत्याची आणि वरिष्ठ अधिकाऱ्याची हिंमत झालेली नाही.
Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis
Anil Deshmukh Vs Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : नागपूर जिल्ह्यात फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिबीर आयोजित करून कामगारांना किट वाटप केल्या जात असल्याचे समोर आल्याने असंघटित व बांधकाम कामगार कल्याण मंडळचा कारभार सध्या चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या विरोधात उच्च न्यायालयाच याचिका दाखल केली असून येत्या शुक्रवारी मंडळाच्या अधिकाऱ्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे.

यामुळे शासकीय सेवेत नियुक्त झाल्यापासून नागपूर विभागातच कार्यरत असणारे सहायक कामगार आयुक्त अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्यांची बदली गोंदिया जिल्ह्यात झाली आहे. असे असले तरी तेथूनच नागपूर जिल्ह्याचा कारभार बघत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीची सत्ता असतानाही त्यांना हात लावण्याची एकाही नेत्याची आणि वरिष्ठ अधिकाऱ्याची हिंमत झालेली नाही.

Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis
Anil Deshmukh : फडणवीस-देशमुख यांच्यातील वाद पुन्हा उफाळणार, नेमकं कारण काय?

सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकल्यास विरोधकांकडे जायचे आणि विरोधकांनी आरोप केल्यास सत्ताधाऱ्यांचे वजन वापरायचे आणि नागपूरमधील नियुक्ती कायम ठेवायची असे त्यांचे धोरण आहे. अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघात आजवर कामगारांना साहित्य वाटपासाठी शिबिराचे आयोजनास नकार देण्यामागे ही त्यांची खेळी असल्याची चर्चा कामगार कल्याण कार्यालयात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात कामगार संघटनांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची प्रधान सचिवांनी दखल घेतली नाही. कामगार कल्याण मंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याही अनेक तक्रारी आहेत.

वरिष्ठ अधिकारी तक्रारी ऐकूण घेतात मात्र कारवाई करीत नाही. गोंदियात बदली झाली असताना नागपूर कार्यालयाचा पदभार त्यांच्याचकडे कायम ठेवण्यात आला आहे. यावर नागपूरमध्ये कोणीच काम करायाला तयार नाही असे वरिष्ठ अधिकारी सांगतात. त्यावरून सहायक कामगार आयुक्तांचे राजकीय वजन किती जास्त आहे हे दिसून येते. अनिल देशमुख यांनी त्यांची तक्रार केली आहे. फक्त भाजप(BJP) नेत्यांच्याच मतदारसंघात ते किट वाटप करतात असा आरोप त्यांचा आहे. मंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव यांच्यावर त्यांचा रोष आहे. त्यांच्या सांगण्यावरून आपल्या मतदारसंघात शिबिर घेण्यात येत नसल्याचे देशमुखांचे म्हणणे आहे. मुन्ना यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अधिकारी माझेच ऐकत नाही.

अनेकदा संबंधित मंत्री व कामगार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कुठलीच कारवाई झालेली नाही. सत्ताधारी व विरोधकांमध्ये भांडणे लावली की आपले फावते, कोणी हात लावत नाही असे त्यांचे धोरण आहे. देशमुखांच्या मतदारसंघात शिबिराला नकार द्यायला मी सध्या मंडळाचा अध्यक्ष नाही. मात्र सहायक कामगार आयुक्त हेच त्यांना माझे नाव सांगून आपसात भांडणे लावत असल्याचे मुन्ना यादव यांचे म्हणणे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com