Akole News : महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान करून विरोधकांच्या निशाण्यावर आलेले शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर आता तिचे प्रकाश आंबेडकरही भडकले आहेत. याआधी नको ते बोलणाऱ्या भिडेंवर कारवाई झाली असती तर ही भिडे आता महात्मा गांधींवर बोललेच नसते, असे सांगून आंबेडकरांनी एकप्रकार सरकारलाच सुनावले आहे.
महात्मा गांधीबाबत आक्षेपार्ह बोलून भिडेंनी नवा वाद ओढवून घेतला आहे. भिडेच्या वादाचे पडसाद उमटून काही राजकीय पक्षांसह संघटनाही रस्त्यावर उतरल्या आहेत. त्याचवेळी या प्रकरणात काँग्रेसच्या काही नेत्यांना धमक्या दिल्या गेल्या आहे.
हा वाद, धमक्या आणि परिणामांच्या पाश्र्वभूमीवर आंबेडकरांनी माध्यमांपुढे येऊन आपली भूमिका मांडली. तेव्हा त्यांनी भिडे यांचा समाचार घेतलाच, पण अशा प्रकरणांत भिडेंना पाठीशी घालून सरकार अप्रत्यक्षपणे 'बळ'च दिले असल्याचा रोख आंबेडकरांनी ठेवला.
"संभाजी भिडे यांच्याशी भाजपचा संबध नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही म्हणत असले तरी भाजपच्या किती संघटना हे मी सांगतो. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा (RSS) धार्मिक वादाचा अजेंडा आहे. तो त्यांनी थांबवावा आणि देशाच्या विकासाकडे लक्ष द्यावं," असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.