BJP Assembly Elections 2024: भाजप तपासणार मतदारांचा 'डीएनए' ; कोअर कमिटीच्या बैठका सुरू..

BJP Core Committee Meeting: ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मते किती मतदारसंघात मिळतील,याची चाचपणी सदस्य करीत आहेत.
 BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मुंबई महापालिका आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांचा कल काय आहे, हे तपासण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठका सुरू आहेत.

कोअर कमिटीचे सदस्य वार्डनिहाय मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक घटकांचा कल कोणत्या पक्षाला आहे, याची माहिती घेण्यात येत आहे. कोअर कमिटीच्या सदस्यांवर दोन ते तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मते किती मतदारसंघात मिळतील,याची चाचपणी सदस्य करीत आहेत.

 BJP
Bachchu Kadu On Sambhaji Bhide: एकनाथ शिंदेंनी घडाघडा बोलावं ; संभाजी भिडेंच्या वादात बच्चूभाऊंनी मुख्यमंत्र्यांना ओढलं

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली तर यश मिळेल, अशी परिस्थिती असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राजकीय समीकरण बदलली आहेत. शिंदे गट आणि भाजपच्या सोबत आता राष्ट्रवादीही सत्तेत वाटेकरी आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत गणिते बिघडू शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

 BJP
Yashomati Thakur News : काँग्रेस नेत्यांना धमक्यांचे सत्र सुरूच ; पृथ्वीराज चव्हाणांनंतर यशोमती ठाकूर यांना धमकी..

या निवडणुकीमध्ये मेट्रो, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, वंदे भारत योजना, तसेच मुंबईत पाऊस पडल्यानंतर होणारे रस्ते ब्लॉक या सगळ्यां मुद्द्यांवर मुंबईची निवडणूक होणार असल्याचे दिसते.

आगामी निवडणूक राष्ट्रवादी (अजित पवार गट) भाजपासोबत आहे, या गटाचा भाजपला फायदा होणार की तोटा हे येणारा काळच ठरवणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काँग्रेस हे एकत्र लढणार आहे. तर त्यांची थेट लढत ही शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याशी होणार नाही.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com