Mumbai rain politics : पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवली. रस्ते वाहतुकीसह रेल्वे ठप्प झाली. पहिल्या पावसामुळे कोट्यवधींचा चुराडा झाला.
मुंबईत पाणी तुंबण्यास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असून, त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे? असा सवाल करत या लुटारूंना सत्तेतून हाकलून लावा, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मुंबई (Mumbai) महापालिकेने गेल्या 10 वर्षांत 2.19 लाख कोटी रुपये वाटप केले. महापालिकेचा 2025-26चा वार्षिक अर्थसंकल्प इतिहासातील सर्वाधिक म्हणजेच 74,427 कोटी रुपये इतका आहे. हा सर्व पैसे खर्च केलास तरीही मुंबई पाण्याखाली गेली. यामुळे हा पैसा नक्की कुठे गेला, याचा शोध घ्यायला हवा".
मुंबईतील हा गोंधळ अनेक दशकांपासून चाललेल्या भ्रष्टाचाराचा (Corruption) आणि महापालिकेने केलेल्या मॉन्सूनपूर्व कामाचा परिणाम आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे सर्वच गेल्या काही वर्षांच्या भ्रष्टाचारासाठी आणि मुंबईच्या सध्याच्या स्थितीसाठी जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मुंबईच्या मेट्रो लाइन-तीन वरील वरळी भुयारी मेट्रो स्थानक जे पाण्याखाली गेले, हे दृश्य पाहून राज्यात भ्रष्टाचार किती मोठा असेल याची कल्पना करता येते. महाराष्ट्रातील नागरिकांनी आता जागे होण्याची गरज असून, लुटारू भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांना सत्तेतून हाकलून लावण्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
दरम्यान, राज्यात मुसळधार पावसामुळे सुमारे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईत एका तासात 200 मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे शहरात पाणी साचले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.