Prakash Ambedkar Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar On Modi:...तर मोदींनी शरद पवारांची माफी मागावी; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर निशाणा

Vanchit Bahujan Aghadi : राजकीय पक्ष फोडून त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोपही आंबेडकरांनी भाजप आणि मोदींवरच ठेवला.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. फोडाफोडीच्या राजकारणात सत्ता बळकट करण्याचा डाव साधला असून, राजकीय पक्ष फोडून त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोपही आंबेडकरांनी भाजप आणि मोदींवरच ठेवला आहे.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप भोपाळमधील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केला होता. आता या आरोपाची गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची माफी मागावी, याकडेही आंबेडकरांनी लक्ष वेधले. भाजपच्या धोरणांवर आंबेडकरांनी सडकून टीका केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

भाजप सरकारविरोधात प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना जोरदार घणाघात केला. शरद पवारांवर केलेल्या आरोपांची चौकशी करावी. अन्यथा येत्या दहा दिवसांत मोदींनी माफी मागणार का?, असा सवाल करत जर मोदी अशा प्रकारचे राजकीय विधान करत असतील तर त्यांनी आता एका राजकीय पक्षाचा विनाश सुरू केला असल्याचा निशाणाही त्यांनी साधला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT