Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Politics : मुंबई महापालिकेसाठी वंचित-शिवसेनेचं ठरलं; जागा वाटपा संदर्भात आंबेडकरांनी सांगितलं...

Maharashtra Politics : मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जवळपास निश्चित झाली आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार असल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले आहे. ते मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं.

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीमुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष जवळपास एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवणार? याबाबत चर्चा झाली नसल्याचे देखील त्यांनी सांगीतले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ''आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आम्ही शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायला तयार आहोत. मात्र आम्हला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीचा विरोध आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेमध्ये बोलणी देखील झाली आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याचा निर्णय झाला आहे'', असं ते म्हणाले.

''आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायला तयार आहोत. मात्र याला काँग्रेसचा देखील छुपा विरोध असल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. पण शिवसेनेला आता निर्णय घ्यावा लागेल, हे फक्त मुंबई महापालिका निवडणुकांपरतं मी सांगतोय. त्यामध्ये मग काँग्रेस शिवसेनेसोबत येते का? हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच पुणे, पिपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेला बरोबर घेणार का? हे देखील पाहावं लागणार आहे'', असं ते म्हणाले.

83 जागांवर लढण्याची तयारी, पण...

शिवसेनेबरोबरच्या चर्चेआधी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची 83 जागा लढण्याची तयारी होती. मात्र आता शिवसेना जेवढ्या जागा सोडेल तेवढ्या आम्ही लढवू, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

दरम्यान, आता शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT