Vanchit Congress Aghadi: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली असून काल या दोन्ही पक्षांनी समन्वयातून उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये वंचितला अर्थात प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेणं हे काँग्रेसच्या बड्या नेत्यांनाही जमलं नव्हतं.
पण यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं ते घडून आलं. पण आता काँग्रेस अन् वंचितची ही आघाडी मान्य नसलेले काही लोक या आघाडीत मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. तसंच ज्या १६ जागांबाबत संभ्रम परवला जात आहे त्यावरही त्यांनी स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं की, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन पक्षांची मुंबई महानगरपालिकेसाठी आघाडी झाली त्या दिवसापासून त्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे आमच्यामध्ये अंतर कसं निर्माण होईल, मिठाचा खडा कसा पडेल याचा प्रयत्न काहीजण सातत्याने करताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते अतिशय समन्वयक पद्धतीनं सुसंवादाने काम करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ज्या सोळा जागांचा मुद्दा उपस्थित करून दिवसभर चॅनेलवर बातम्या चालवल्या गेल्या. मात्र त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे समन्वयाने आणि सुसंवादाने वंचित बहुजन आघाडी यांच्या नेत्यांनी काल सकाळी काँग्रेसच्या नेत्यांना वरिष्ठांनी माहिती दिली. या 16 जागेवर तुमच्याकडे कोण चांगले उमेदवार असतील तर तुम्ही उभे करू शकता त्यानुसार काँग्रेसनं या जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
त्यामुळं अशा प्रकारे लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी थांबवलं पाहिजे. जनतेला पर्यायानं मतदारांना माझं आवाहन आहे की अशा अफवांना त्यांनी बळी न पडता मजबूतीने काँग्रेस-वंचित आघाडीच्या मागे उभं राहावं, असंही मोकळे यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.