Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Sabha : 'अदानींकडे धारावी हा जगातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा!'

Avinash Chandane

उद्योगपती अदानींकडे दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उद्धव ठाकरेंनी आज जोरदार हल्लाबोल केला. महायुती सरकारचा हा जगातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला. धारावीतून निघालेला मोर्चा अदानींच्या बीकेसी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका केली.

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट अदानींना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे पाप यांनी केले. ५० खोके कमी पडले म्हणून धारावीसह मुंबई गिळायला हे लोक निघाले आहेत. धारावीच्या पुनर्विकासाचे कंत्राट देतानाच अदानींकडे टीडीआरचे हक्क जाणार आहेत. म्हणजे भविष्यात ज्यांना टीडीआर हवा असेल त्यांना अदानींकडे जावे लागणार आहे, असा आरोप ठाकरेंनी केला. हे म्हणजे शासन आपल्या दारी नव्हे तर अदानींच्या दारी, असा घणाघात ठाकरेंनी केला.

आपल्या २२ मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपचा भारतीय जुगारी पार्टी असा उल्लेख करून तुम्ही बिल्डरधार्जिणे आहात असा आरोप केला. भाजपचे सरकार हे दलाल आहे. मी मुख्यमंत्री असताना धारावीविरोधात एकही जीआर काढला नाही, असा दावाही ठाकरेंनी केला. त्याचवेळी खबरदार, मुंबईला हात लावण्याची हिंमत केलीत तर! भाजपच्या जावयाला मुंबई देणार नाही! आता या लढ्याला सुरुवात झाली आहे, असा इशारा ठाकरेंनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धारावीकरांना अपात्र ठरवून त्यांना बाहेर काढण्याचा डाव आहे. असे होऊ देणार नाही. सर्व धारावीकर पात्र ठरवा, त्यांना धारावीतच आहे त्या जागी ५०० चौरस फुटांचे मोफथ घर द्या, घरात लघू उद्योग असणाऱ्यांना जागा द्या आणि बीडीडी चाळींप्रमाणे धारावीचा विकास करा, अशा मागण्या उद्धव ठाकरेंनी यावेळी केल्या. धारावीत पोलीस, गिरणी कामगार, सफाई कामगारांना घरे द्या, असाही आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला.

लोढांवर टीकास्त्र

भाजपचे एका बिल्डरला पालकमंत्री केला. एवढंच नाही तर त्यांना मुंबई महापालिकेत कार्यालयही दिलं. म्हणजे अदानींची कामे करण्याची सोय केली, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

(Edited by - Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT