Dharavi Rehabilitation Project : "उद्धव ठाकरेंनी टीडीआर लाॅबीची सुपारी घेतली..."

Devendra Fadnavis : कितीही मोर्चे निघाले तरी धारावीकरांना घर मिळणारच
Devendra Fadnavis, Uddhav thackeray
Devendra Fadnavis, Uddhav thackeray
Published on
Updated on

Maharashtra Politics News :  : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना पक्षप्रमुख ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे हे अदानी समूहाविरोधात शनिवारी मोर्चा काढणार आहेत.पण या मोर्चाला धारावी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.मात्र, मोर्चा काढण्यावर उद्धव ठाकरे ठाम असल्याचे सांगितले जात आहे.पण, कितीही मोर्चे निघाले तरी धारवीकरांना घर देणारच. उद्धव ठाकरे हे मुंबईतील टीडीआर लाॅबीची सुपारी घेल्यामुळे मोर्चा काढत असल्याची खरमरीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी केली आहे.

Devendra Fadnavis, Uddhav thackeray
Mahavikas Aaghadi News : शेकडो कोटींच्या टीडीआर घोटाळ्यात हे तीन आमदार,'मविआ'च्या नेत्यांचा सनसनाटी आरोप

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत सर्व अटी शर्थी या उद्धव ठाकरे यांनी ठरवल्या होत्या. त्याच प्रमाणे विकसकाला हा प्रकल्प देण्यात आला आहे. मात्र,धारावीच्या गरीबांना घर मिळूनच द्यायचे नाही, असे ठाकरे यांनी ठरवल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अदानी प्रॉपर्टीजला 259 हेक्टरवरील धारावी पुनर्वसनाचे पाच हजार कोटींचे कंत्राट मिळालेले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारने हा निर्णय घेतला. पण यात टीडीआर घोटाळा होत असल्याचा आरोप आता होत आहे.

मुंबईतील मोठे प्रकल्प हे अदानींच्या कंपनीला द्यायचा सरकारचा कट असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.धारावीचा पुनर्विकास करताना 300 चौरस फुटांची घरे देण्यात येणार आहेत. त्याऐवजी 400 ते 500 चौरस फुटांची घरे द्यावीत, ही ठाकरे गटाची मुख्य मागणी आहे. शिवाय धारावीतील सर्व रहिवाशांना घरे द्यावीत, अशीही आग्रही मागणी ठाकरेंनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोर्चा निघणार की नाही

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टिका करत मुंबई अदानीला विकण्याचा डाव असल्याचे म्हटले होते. काही झाले तरी मोर्चा निघणारच असे राऊत म्हणाले होते. मात्र, मोर्चासाठी धारावी पोलिसांनी ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. परवानगीसाठी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवा, अशी सूचना धारावी पोलिसांनी ठाकरे गटाला केली आहे. यानंतर ठाकरे गटाने मुंबई पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या सगळ्या पार्श्वभुमीवर परवानगी नसताना मोर्चा निघणार की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.

(Edited by Roshan More)

Devendra Fadnavis, Uddhav thackeray
Amol Shinde Family : "...नाहीतर मी आत्महत्या करेन!" ; संसदेची सुरक्षा भेदणाऱ्या मुलाच्या वडिलांचा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com