RORO Fery boat Sarkarnama
मुंबई

Vasai-Bhayander News : वसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सेवा तूर्तास प्रायोगिक तत्त्वावरच!

Pankaj Rodekar

Vasai Bhayandar Ro Ro ferry boat service : वसई आणि भाईंदर ही शहरे एकमेकांना जलमार्गाने जोडणाच्या दृष्टीने, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मे. सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या ऑपरेटर संस्थेद्वारे 20 फेब्रुवारी 2024 पासून सुरू करण्यात आलेली वसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सेवा ही तूर्तास फक्त प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली आहे.

या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारिक शासकीय लोकार्पण सोहळा अद्याप झालेला नाही. असे प्रसिद्धिपत्रक महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुंबई, मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रवीण एस. खरा यांनी काढले आहे. यामुळे बहुजन विकास आघाडीसह भाजप आणि उद्धव ठाकरे गटाने यानिमित्ताने केलेल्या जोरदार शक्तीप्रदर्शनाची हवा निघाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या रो - रो सेवेमुळे भाईंदर व वसई किनारपट्टी असा प्रवास वाहने घेऊन करता येणार आहे. मंगळवारी आमदार क्षितीज ठाकूर हे वाहनाने बोटीतून बाहेर पडले. त्यानंतर बोट पुन्हा वसईच्या दिशेने रवाना झाली, तर दुसऱ्या बोटीवर खासदार राजन विचारे यांच्या हस्ते रो रो सेवेचे फीत कापून व श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. परंतु आता हे लोकार्पण औपचारिक नसल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारिक शासकीय लोकार्पण सोहळा अद्याप झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तूर्तास या फेरीबोटीचे जलमार्गातून होणारे नौकानयन तसेच बोटीतून प्रवासी व वाहनांची जेट्टीवर चढ उतार सुलभ व सुरक्षितपणे होत आहे किंवा कसे, या बाबींचा महाराष्ट्र सागरी मंडळाकडून अभ्यास करण्यात येत आहे.

या सर्व बाबींची एकदा खात्री झाल्यानंतरच, फेरीबोट सेवेचा शासकीय लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे. त्यामुळे वसई, भाईंदर या रो - रो फेरीबोट सेवेचा शासकीय लोकार्पण सोहळा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी ते चुकीचे असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई मुख्य बंदर अधिकारी खरा यांनी स्पष्ट केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT