लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बैठकांचा सिलसिला सुरू आहे. जागावाटपाच्या काही जागांचा निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीची उद्या (22 फेब्रुवारी) बैठक होणार होती. पण अचानक ही बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी बैठक आता 27 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे.
या बैठकीचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahuja Aaghadi) पाठवलं नसल्याचं कळतंय. मात्र, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
राज्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) सर्व 48 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला (BJP) हरवण्याचा चंग 'मविआ'ने बांधला आहे. त्यादृष्टीने दोन-तीन महिन्यांपासून तयारी सुरू आहे. जागावाटपाची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात उद्या मुंबईत बैठक होणार होती. पण, ती रद्द करून बैठकीची नवी तारीख जाहीर केली आहे.
पण, या बैठकीला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवले नसल्याचे कळते. वास्तविक महाविकास आघाडीत (MVA) समावेश करावा, यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील होती. अखेर 30 जानेवारी रोजी अधिकृत पत्र काढून वंचितचा महाविकास आघाडीत समावेश केल्याचे तिन्ही पक्षांनी जाहीर केली. त्यानंतर 2 फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी काही जागांची मागणी केल्याचे कळते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही, तिढा नाही, असं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. एवढंच नव्हे तर अगदी थोड्या जागांचा प्रश्न आहे. तेही वाटप लवकरच पूर्ण होईल. हत्ती गेला शेपूट राहिलंय, अशी स्थिती आहे, असं अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता 27 फेब्रुवारीच्या बैठकीत काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना हे तीन पक्ष सहभागी होतील. तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण गेल्यास आणि त्यांनी ते स्वीकारल्यास तेही सहभागी होतील.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.