Prakash Ambedkar- Vasant More Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar On Vasant More : अवघ्या 60 दिवसांतच 'वंचित'ला सोडलेल्या वसंत मोरेंची आंबेडकरांनी घेतली झाडाझडती

Vasant More will enter Uddhav Thackeray group in Shiv Sena : शिवसेनेत प्रवेश करणाची घोषणा करणाऱ्या वसंत मोरेंना आंबेडकर यांनी कडक शब्दात टोले लगावले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची माहिती देखील आंबेडकर यांनी दिली.

Chaitanya Machale

Mumbai News : वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचे पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी जाहीर केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत वंचितच्या लोकांनी, मतदारांनी आपल्याला स्वीकारले नसल्याचे कारण देत शिवसेनेत जाणार असल्याचे सांगणाऱ्या मोरेंना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले आहे.

वसंत मोरेंना माणसे ओळखता येत नाही, त्यांच्याकडून सातत्याने या गोष्टी घडत आहेत. त्यांचे राजकारण आयाराम-गयारामांप्रमाणे आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली. दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनामुळे वंचित बहुजनच्या अनेक कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी आंबेडकर यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी विविध विषयांवर भाष्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (MNS) वसंत मोरे वंचितमध्ये आले होते. वंचितने त्यांना पुण्यातून लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना दारूण पराभव पत्कारावा लागला. शिवसेनेत प्रवेश करणाची घोषणा करणाऱ्या वसंत मोरेंना आंबेडकर यांनी कडक शब्दात टोले लगावले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची माहिती देखील आंबेडकर यांनी पत्रकारांना दिली.

राज्य सरकारच्या वतीने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये दररोज नवीन प्रकार समोर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राज्य सरकारने मतांचा जोगवा गोळा करण्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. मात्र, गॅसचे भाव कधी कमी होणार? यातून महिलांना अन्नधान्य पुरणार का? माझ्या बहिणींची फी यामधून भरली जाणार आहे का? असे प्रश्न देखील यावेळी आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT