Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरे गटात करणार प्रवेश ?

Vasant More Meet Uddhav Thackeray At Matoshree bungalow : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी मातोश्री वरती जाऊन वसंत मोरे हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला आहे.
Vasant More Meet Uddhav Thackeray
Vasant More Meet Uddhav ThackeraySarkarnama

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यामुळे वसंत मोरे यांच्या ठाकरे गटाच्या प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसेला (MNS) सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढलेले वसंत मोरे आता नवीन राजकीय वाट निवडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी मातोश्री वरती जाऊन वसंत मोरे हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला आहे.

Vasant More Meet Uddhav Thackeray
Vasant More : 'वंचित'च्या आणखी एका पराभूत उमेदवाराने घेतली नवीन कार

आगामी विधानसभा निवडणुकींमध्ये वसंत मोरे (Vasant More) हडपसर अथवा खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकींमध्ये या दोन्हीपैकी एक जागा ठाकरे गटाला सुटल्यास त्या जागेवरती वसंत मोरे हे ठाकरे गटामध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित करू शकतात असं बोललं जात आहे.

Vasant More Meet Uddhav Thackeray
Ladki Bahin Yojana:...तर दीड हजारांसाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही; 'लाडकी बहीण' बरोबर ही योजना आणा!

लोकसभा निवडणुकीमध्ये वसंत मोरे यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागलं होतं. वसंत मोरे यांना लोकसभा निवडणुकीत डिपॉझिट ही वाचवता आलं नव्हतं मात्र तरी देखील आपण शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडीची साथ सोडणार नाही असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केल. मात्र आता वसंत मोरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने ते नवीन राजकीय वाट निवडणार का याबाबतच्या चर्चांना देखील उधाण आल आहे.


दरम्यान आज वसंत मोरे हे ठाकरे गटात प्रवेश देखील करू शकतात असं देखील बोलले जात आहे. त्यामुळे आता नेमक्या काय घडामोडी घडणार हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com