Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Vice President Election : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 'मविआ'चे नेते मॅनेज होणार? फडणवीसांनी हाती घेतली सूत्र

CP Radhakrishnan vs Sudarshan Reddy : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीकडून उपरराष्ट्रपती पदासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 21 Aug : उपराष्ट्रपती पदासाठी भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने देखील उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार दिला आहे.

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीकडून उपरराष्ट्रपती पदासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सुरूवातील बिनविरोध होईल असं वाटत असणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आता सी.पी राधाकृष्णन विरुद्ध बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे.

त्यामुळे आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आपापल्या उमेदवाराल निवडणून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भातील एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, फडणवीसांनी याआधीही मविआच्या नेत्यांना या निवडणुकीत सी. पी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याबाबत विनंती करणार असल्याचे सांगितले होतं.

त्यामुळे आता फडणवीसांच्या विनंतीनंतर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा (ता.21) शेवटचा दिवस आहे. तर  9 सप्टेंबरला मतदान पार पडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT