Thackeray on New Bill : 'शहांचा नवा कायदा चंद्राबाबू आणि नितीशकुमारांचा 'कार्यक्रम' करण्यासाठी! त्यांनी मोदी सरकारचा पाठिंबा काढला तर...'

Amit Shah bill controversy : आपल्या राजकीय विरोधकांना जेरबंद करण्यासाठी हा नवा फासाचा दोर आवळला आहे. या कायद्याद्वारे केंद्र सरकार जेथे भाजप मित्रपक्षांची सरकारे नाहीत तेथील मुख्यमंत्री, मंत्री यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करतील.
Nitish Kumar, Amit Shah, Chandrababu Naidu
Shiv Sena (Thackeray faction) accuses Amit Shah of using the new law to target opposition leaders like Chandrababu Naidu and Nitish Kumar, intensifying political tensions.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 21 Aug : गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये 30 दिवसांहून अधिक काळ अटकेत राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्याची तरतूद असलेले विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत मांडलं. या विधेयकावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला.

काही सदस्यांनी तर थेट शहांसमोर विधेयकांच्या प्रती फाडून फेकल्या. त्यानंतर हे विधेयके संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं आहे. मात्र, याच विधेयकावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. "अमित शहा नैतिकता, साधनशूचितेच्या नावावर विरोधकांचे मुख्यमंत्री, मंत्री यांना तुरुंगात टाकायला निघालेत.

देवेंद्र फडणवीस ज्यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते ते अजित पवार आज शहांच्या खिशात जाऊन बसलेत. त्यामुळे शहा कोणत्या नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून केला आहे.

तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या मंत्र्यांनी केलेले घोटाळे आणि गुन्हे सोन्याच्या तराजूत तोलणार का? या सगळ्यांचे गुन्हे केंद्र सरकार दडपणार आणि नव्या कायद्याचा बडगा विरोधी पक्षाला दाखवणार! मोदी, शहा, फडणवीस यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.

Nitish Kumar, Amit Shah, Chandrababu Naidu
CSDS News : मोठी बातमी: महाराष्ट्रातील मतदारयाद्यांत मोठा घोळ असल्याचा गंभीर आरोप केलेल्या संजय कुमार यांच्या अडचणीत वाढ

विरोधकांची एकजुटीमुळे भयग्रस्त झालेल्या या लोकांनी नवे संशोधक विधेयक आणलं आहे, अशी टीका ठाकरेंनी केली आहे. तसंच यावेळी हे विरोधक नेमकं कशासाठी आणलं आहे. याबाबत मोठा दावा सामनातून करण्यात आला आहे. हे संविधान संशोधन विधेयक नक्की कोणासाठी आणले जात आहे? सरकारची मनीषा स्वच्छ नाही.

आपल्या राजकीय विरोधकांना जेरबंद करण्यासाठी हा नवा फासाचा दोर आवळला आहे. या कायद्याद्वारे केंद्र सरकार जेथे भाजप मित्रपक्षांची सरकारे नाहीत तेथील मुख्यमंत्री, मंत्री यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करील. चौकशा लावील व ईडी, सीबीआयची पथके सरकारी निवासस्थानी घुसवून अटक करील.

Nitish Kumar, Amit Shah, Chandrababu Naidu
BEST Election Result : बेस्ट पतपेढीचा निवडणुकीत ठाकरे बंधुंचा पराभव, मुंबई महापालिकेवर काय परिणाम?

विरोधकांची सरकारे पाडण्याचा, अस्थिर करण्याचा हा नवा कायदा आहे. मोदी-शहा त्या मुख्यमंत्र्यांना संदेश देतील, अटक आणि सरकार वाचवायचे असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा. सध्या या कायद्याची सगळ्यात जास्त भीती आंध्रचे चंद्राबाबू नायडू व बिहारचे नितीशकुमार यांना आहे.

या दोघांनी पाठिंबा काढून घेतला तर मोदी-शहांचे सरकार कोसळेल. त्यामुळे नायडू-नितीशकुमार अशा हालचाली करण्याआधीच त्यांचा ‘कार्यक्रम’ करण्यासाठी हे विधेयक आणले काय? नवीन कायद्याचा एकमेव हेतू हा आणि हाच आहे, असा मोठा दावा सामनातून करण्यात आला आहे.

शिवाय भाजपची सर्व सरकारे मतचोरीतून सत्तेवर आली आहेत. राहुल गांधींनी निवडणूक आयोग व भाजपच्या या दरोडेखोरीविरुद्ध देशात वणवा पेटवल्यामुळे जनता जागृत झाल्यामुळे विरोधकांची सरकारे राज्यात आलीच तर अमित शहा या नव्या कायद्याचा धाक दाखवून संपूर्ण सरकारला आयाराम मंत्र देऊन भाजपमध्ये प्रवेश करायला लावतील. देशात हे जे सुरू आहे त्याविरोधात सर्वच स्तरांवर आवाज उठवायला हवा, असं म्हणत या कायद्याला तीव्र विरोध करण्याचं आवाहन ठाकरेंनी सर्व विरोधकांना केल्यां पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com