Narayan Rane, Uday Samant, Shambhuraj Desai
Narayan Rane, Uday Samant, Shambhuraj Desai Sarkarnama
मुंबई

Election Commission : बाळासाहेबांच्या विचारांचा, सत्याचा विजय; राणेंसह शिंदे गटाची भावना

सरकारनामा ब्युरोे

Eknath Shinde : केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाच्या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा, सत्याचा विजय असल्याची भावना शिंदे गटातील पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली. हा निकाल शिवसैनिकांच्या कष्टाचा विजय असल्याचे राणे म्हणाले.

राणे म्हणाले, "शिवसैनिकांनी एवढे वर्षे शिवसेना घडविण्यासाठी कष्ट घेतले, घाम गाळला त्यामुळे हा निकाल म्हणजे त्यांना मिळालेल्या पुरस्कार आहे. त्यामुळे जो कोणी एक शिवसेना माझा पक्ष आहे, असे म्हणत होते, त्यांना चपराक आहे. या निकालामुळे शिवसैनिकांना नाव मिळालं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या निकालातून उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना मोठी चपराक आहे."

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी हा बाळासांहेबांच्या विचारांचा विजय असल्याचे म्हटले आहे.

उदय सामंत म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो होतो. आजच्या निकालाने आमच्या उठावाचा विजय झाला आहे. त्यामुळे मध्यंतरी निर्माण झालेल्या शंका-कुशंका आता बंद होतील. हा सत्याचा विजय आहे. या निर्णयाच्या माध्यमातून शिवसेनेने कोणाबरोबर जाऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे, हेच बाळासाहेबांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे बाळासाहेबांच्या विचाराला पाठबळ मिळाले."

या निकालाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळाल्याची भावना राज्यमंत्री शभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केली.

देसाई म्हणाले, "केंद्रीय निवडणुकीच्या निर्णय म्हणजे सत्याचा विजय. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आमची बाजू सत्याची आहे. न्यायाची आहे. आम्ही कोणतेही नियमबाह्य काम केलेले नाही. मात्र सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आजचा निकाल म्हणजे सत्याला न्याय मिळाला आहे. आम्ही बाळासाहेबाचं विचार घेऊन जात आहोत. त्याला त्यांचे आशीर्वाद आहेत."

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी तर आता एकनाथ शिंदे गट नाही तर शिवसेना पक्ष असल्याचे सांगितले.

म्हस्के म्हणाले, "आम्हाला आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्हं मिळालेलं आहे. आता एकनाथ शिंदे नावाचा गट नाही. शिवसेना मूळ पक्ष जो हिंदुत्व विचारांपासून दूर गेला होता, तोच पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेबांचा आशीर्वाद, आनंद दिघे यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे होता. तमाम शिवसैनिकांची बाळासाहेबांच्या पक्षासाठी प्रार्थना केली होती. त्याचे फळ मिळाले आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT