Shiv Sena Symbol :
Shiv Sena Symbol :Sarkarnama

Shiv Sena Symbol : धनुष्यबाण गमावल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया : म्हणाले, "खोक्यांचा विजय.."

Shiv Sena Symbol : "निवडणूक आयोगाने विश्वास गमावला.."
Published on

Shiv Sena Symbol : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अखेर धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्यात आलेले आहे. हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता. आज अखेर शिंदेंना धनुष्यबाण चिन्हं देण्यात आलेले आहे. या प्रकरणी सुप्रिम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू होती. या दरम्यानआयोगाने हा निर्णय आज दिला आहे.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याची आता स्पष्ट झाले आहे. अनेक दिवसांपासून आयोगाकडून हा निर्णय प्रलंबित होता. अनेकांचे याकडे लक्ष लागले होते.आज ७८ पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र दिले आहे.

दरम्यान, या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे."सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य तोडून असत्यमेव जयते करावं लागेल. खरेदी विक्री कुठपर्यंत गेलेली आहे, हे स्पष्ट झालं. जो पक्ष बाळासाहेबांनी उभा केला, शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देवून उभं केलं. तो पक्ष चाळीस बाजारबुणगे विकत घेतात, याची नोंद इतिहासात राहिल. निवडणूक आयोगाने लोकांचा विश्वास गमावला. सगळ्या स्वायत्त यंत्रणा यांना गुलाम करण्यात येत आहे.हा खोक्यांचा विजय आहे. प्रचंड पैशांची उधळण झाली, आम्ही याला आव्हान देवू," असे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com