Vidhan Bhavan Hussle: विधानभवनाच्या लॉबीमध्ये काल झालेल्या आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामुळं विधानभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं होतं. यापार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून या घटनेचा अहवाल मागवला होता. हा अहवाल पात्र झाल्यानंतर त्यावर अध्यक्षांनी मोठा निर्णय दिला आहे. त्यानुसार जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांना दोषी ठरवत त्यांच्यासह आलेल्या नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांच्यावर पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले अभ्यंगत नितीन देशमुख तसंच गोपिचंद पडळकर यांच्यासोबत आलेले सर्जेराव टकले या दोघांचे वर्तन सभागृहाला प्रतिष्ठेला मलिन करणारे असल्यानं एकप्रकारे सभागृहाचा विशेषाधिकार भंग आणि अवमान केला आहे. त्यामुळं या संदर्भातील कारवाईसाठी हे प्रकरण मी विधानसभा विशेष अधिकार समितीकडं सुपूर्द करत आहे.
दरम्यान, यानंतर लगेचच सभागृहात उपस्थित असलेल्या गोपिचंद पडळकर यांनी खेद व्यक्त करताना म्हटलं की, "आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं मी तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो" त्यानंतर आव्हाडांनी खेद व्यक्त करताना म्हटलं की, "आपण बोलत असताना असं म्हणालात की नितीन देशमुख हे माझ्यासोबत आले होते. पण सभागृहात येताना मी फक्त एकटाच येतो मी कोणाला आणत नाही. माझ्या मागे फक्त माझा पीए चालत असतो.
या व्यतिरिक्त माझ्यासोबत कोणीही नसतं. मी कुठल्याही पासवर सही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही. त्यामुळं रेकॉर्डमध्ये चुकीचं येऊ नये यासाठी सांगतो की नितीन देशमुख हे आपल्या ताब्यात आहे त्यांना विचारा ते इथं कसे आले होते. त्यामुळं मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून हे सांगतो आहे. काल जी घटना घडली तेव्हा मी सभागृहात नव्हतो या परिसरातही नव्हतो. त्यावेळी मी मरिन्स लाईन्स इथं होतो. त्यामुळं या घटनेशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे माझा काहीही संबंध नाही. त्यामुळं ही घटना घडावी यासाठी मी कोणालाही उद्युक्तही केलेलं नाही. जे झालं ते चुकीचं झालं याबद्दल मला वाईट वाटतं"
यानंतर जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर या दोघांनी जी माहिती दिली आहे. त्याची देखील चौकशी करुन मी योग्य तो निर्णय घेईन, असंही यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी सभागृहात सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.