Rahul Narvekar 
मुंबई

Vidhan Bhavan Hussle: ...तर सदस्यत्व होणार रद्द! राहुल नार्वेकरांनी दिले संकेत; मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अहवालावर केलं महत्वाचं भाष्य

Vidhan Bhavan Hussle: विधानभवनाच्या लॉबीमध्ये झालेल्या मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीनंतर सर्वच स्तरातून या घटनेवरुन टीका होत आहे.

Amit Ujagare

Vidhan Bhavan Hussle: मुंबईत विधानभवनाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. हाणामारीत एकमेकांचे कपडे देखील फाडले गेले, या घटनेमुळं राज्यात सर्वच स्तरातून या घटनेवर टीका होत आहे. यापार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या घटनेची माहिती घेणारा अहवाल मागवला होता.

मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल अध्यक्षांकडं शुक्रवारी सादर केला. हा अहवाल हाती आल्यानंतर अध्यक्षांनी संसदेत अशा घटनांविरोधात असलेल्या नियमावलीची सभागृहातील सर्व सदस्यांना आठवण करुन दिली. यामध्ये सदसत्व देखील रद्द होऊ शकतं, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. या दृष्टीनं एक एथिक्स कमिटी स्थापन करण्यात येणार आहे.

...तर सदस्यत्व रद्द होणार

नार्वेकर म्हणाले, ठयासंदर्भात आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नितीमुल्य समिती अर्थात एथिक्स समिती गठीत करण्याचं विचाराधीन आहे. लवकरच सभापतींशी विचारविनिमय करुन आणि गटनेत्यांशी संपर्क साधून या विषयाचा निर्णय पुढच्या एक आठवड्यात घेण्यात येईल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, संसदेची जी नितीमुल्य समिती आहे, त्या समितीकडं मोठ्या प्रमाणावर अधिकार आहेत. त्यांनी यापूर्वी केवळ खासदारांचं निलंबनच नाही तर सदस्यत्व देखील रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं ही नितीमुल्य समिती स्थापन झाल्यानंतर सदस्यांनी याच्या गांभीर्याची नोंद घ्यावी"

सदस्य, स्वीय सहाय्यक, अधिकाऱ्यांनाच प्रवेश

गेल्या काही दिवसांमध्ये विधीमंडळ सदस्यांबाबत ज्या घटना घडल्या त्यामुळं विधानसभा सदस्यांप्रती लोकांच्या मनात अनादर निर्माण होईल की काय? अशी शंका माझ्या मनात निर्माण होत आहे. विधानमंडळाच्या उच्च प्रथापरंपरा याचं पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे. कारण शेवटी आपले उत्तरदायित्व संविधानाशी आहे. विधानमंडळासह सर्व संस्था संविधानातून निर्माण झालेल्या आहेत. विधानमंडळाचे सदस्य म्हणून कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाप्रती खरी श्रद्धा, निष्ठा बाळगण्याची व आपलं कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची आपण शपथ घेतली आहे.

याचं आपण गांभीर्यपूर्वक पार पाडण्याची शपथ घेतली आहे त्याचं आपण सर्वांनी गांभीर्यपूर्ण पालन करणे अपेक्षित आहे, त्या दृष्टीनं मी जाहीर करत आहे की, विधानमंडळ परिसरात अधिवेशन काळात यापुढे केवळ सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल. इतर अभ्यांगतांना प्रवेश देण्यात येणार नाही, असे स्पष्ट आदेशही यावेळी विधानसभा अध्यक्षांनी दिले.

अन्यथा परवानगी मिळणार नाही

दरम्यान, बऱ्याचवेळी मंत्र्यांकडूनही वेगवेगळ्या बैठका विधानभवनाच्या दालनात आयोजित करण्याची आणि अभ्यांगतांना प्रवेशाची विनंती करण्यात येते. त्यामुळं आता मंत्र्यांनी देखील याची बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात घ्याव्यात असं सुचित करण्यात येत आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत अध्यक्ष व सभापती यांच्या समवेत असलेल्या मंडळाची मान्यता घेतल्याशिवाय मंत्र्यांना विधानमंडळात बैठक घेण्याची आणि अभ्यांगतांच्या प्रवेशाला परवानगी देण्यात येणार नाही, अशी नियमावली यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कथन केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT