Niranjan Davkhare | Neelam Gorhe | Ram Shinde Sarkarnama
मुंबई

Vidhan Parishad Election: नीलम गोऱ्हे यांना प्रमोशन मिळणार का? विधानपरिषदेचा सभापती कोण होणार

Legislative Council Chairperson Election : सध्या नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेचे कामकाज पाहतात, त्यांनाच प्रमोशन मिळणार की यावर भाजपचे वर्चस्व राहणार, हे लवकरच समजेल.

Mangesh Mahale

Nagpur News: विधानपरिषदेचे सभापतीपद दोन वर्षांपासून रिक्त आहे. सध्या नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीची निवड प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे.

विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीत चुरस असणार, हे साहजिकच आहे. तीनही घटक पक्षातील काही नेते सभापतीपदासाठी गुडद्याला बांशिंग बांधून बसले आहेत. या पदावर कुणाची वर्णी लावायची हा मोठा पेच पक्षश्रेष्ठींसमोर आहे. विधानपरिषद कुणाला वाट्याला जाणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे या इच्छुक आहेत. भाजपकडून राम शिंदे, निरंजन डावखरे हे दोन्हीही इच्छुक आहेत. विधानसभेचे अध्यक्ष भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे, त्यामुळे विधान परिषदेचे सभापतीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार की भाजप आपल्याकडे ठेवणार, याबाबत राजकीय वर्तुळाच उत्सुकता आहे.

सध्या नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेचे कामकाज पाहतात, त्यांनाच प्रमोशन मिळणार की यावर भाजपचे वर्चस्व राहणार, हे लवकरच समजेल. महायुतीकडून विधानपरिषद निवडणुकीची तारीख निश्चित करुन सर्वसहमतीने एकच उमेदवार निवडला जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट 2022 मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. महायुती सरकारमध्ये आगामी काळासाठी हे पद फार महत्त्वाचे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या पदाची निवड लवकर घेण्यासाठी महायुती आग्रही आहेत. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीत चुरस असणार, हे अपेक्षितच आहे.

कशी असते निवडणूक प्रक्रिया

विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख ही राज्यपालांकडून निश्चित केली जाते. त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारे पत्र राज्यपालांना पाठवावे लागते.या हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीची तारीख कळवण्याबाबत राज्यपालांना पत्र देतील, अशी शक्यता आहे.

द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह

महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. याठिकाणी विधान परिषद अस्तित्वात आहेत. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT