पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथा दिवशी विरोधकांनी राज्यातील पेपरफुटीच्या मुद्दांवरुन सरकारला घेरलं. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पेपरफुटीत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोरातांच्या आरोपाला उत्तर दिले.
पेपरपफुटी बाबत राज्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोणत्याही गैरव्यवहाराशिवाय ७७ हजार ३०५ जणांना सरकारने नोकऱ्या दिल्या आहेत. सरकारच्या यापुढील परीक्षा TCSच्या केंद्रावरच होणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. परीक्षा घेण्याची पद्धत आपण ठरवली पाहिजे, त्यासाठी कार्यक्षम प्रशासन असणे गरजेचे आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
पेपरफुटीबाबत या अधिवेशनात कायदा आणणार का? असा प्रश्न रोहित पवार यांनी फडवीसांना केला. पेपरफुटीच्या विरोधातील कायदा याच अधिवेशनात आणा, असा आग्रह रोहित पवार यांनी धरला.
पेपरफुटीचे नरेटिव्ह सेट करु नका, असे फडणवीसांनी विरोधकांना सुनावले. तलाठी परीक्षेचा पेपर फुटला नव्हता, उत्तर चुकलं होते. पेपरफुटीच्या विरोधातील कायदा याच अधिवेशनात आणणार, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विविध मुद्द्यांवरून विरोधकांचे सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले. पेन्शनच्या बाबत बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. दुसरीकडे लोकसभा अधिवेशनात नीट परीक्षेवरुन विरोधकांना गोंधळ घातला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.