Devendra Fadnavis, Ram Kadam, Amit Shah Sarkarnama
मुंबई

Mumbai BJP News : भाजपचा मुंबईतील विद्यमान आमदारांना मोठा धक्का! राम कदमांसह 'या' 5 जणांचा पत्ता कट होणार?

Jagdish Patil

Mumbai News, 17 Oct : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जोरदार फटका बसलेला भारतीय जनता पक्ष (BJP) विधानसभेसाठी चांगलाच तयारीला लागला आहे. लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते पक्षात अनेक महत्वपूर्ण बदल करताना दिसत आहे.

अशातच आता ज्या विद्यमान आमदारांची (MLA) कामगिरी चांगली नाही. अशा आमदारांना विधानसभेचं तिकीट मिळणार नसल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी आली आहे.

त्यानुसार भाजप (BJP) मुंबईत अनेक मोठे आणि धक्कादायक बदल करणार आल्याचं बोललं जात आहे. यानुसार अनेक विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे. या आमदारांमध्ये भाजपचे घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांचंही तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे.

सुमार कामगिरीमुळे तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कदमांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवाय लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत कदम यांच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा पिछाडीवर पडले होते. याचाही विचार पक्षाने केल्याचं पाहायला मिळत आहे. तर राम कदम यांच्यासह मुंबईत इतर पाच आमदारांचं तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे.

यामध्ये वर्सोवा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्याऐवजी संजय पाण्डेय यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. तर सायन मतदारसंघात कॅप्टन तमिल सेल्वन यांच्याऐवजी राजश्री शिरवडकर, घाटकोपर पूर्वमध्ये पराग शहा यांच्याऐवजी प्रकाश मेहता आणि बोरिवलीतील सुनील राणेंना डावलून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे.

तर राम कदमांच्या जागी महायुतीचा नवा उमेदवार कोण असणार याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर तिकीट नाकारलेले हे आमदार पक्षाचा आदेश पाळत दुसर्‍या उमेदवारांचे काम करणार की बंडखोरी करणार? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT