RSP Vidhan Sabha News : जानकरांनी पहिला डाव टाकला! 'रासप'च्या 25 उमेदवारांची यादी जाहीर, बारामतीतून कोण?

List of 25 candidates of Rashtriya Samaj Party announced : विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार रासपचे उमेदवार उभे केले जाणार असल्याची घोषणा महादेव जानकर यांनी नुकतीच केली होती. त्या पहिल्या 25 संभाव्य उमेदवारांची यादी साम टीव्ही हाती आली आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीशी घरोबा केलेले आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी विधानसभा निवडणुकीत 'एकला चलो'चा नारा दिला आहे.

शिवाय त्यांनी विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार रासपचे उमेदवार उभे केले जाणार असल्याची घोषणा नुकतीच केली होती.

त्यानुसार रासपच्या (RSP) पहिल्या 25 उमेदवारांची यादी दोन दिवसांत जाहीर केली जाणून असून या उमेदवारांची संभाव्य यादी साम टीव्ही हाती आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'रासप'च्या पहिल्या यादीत सुमारे 25 उमेदवारांना तिकीट मिळणार आहे. तर मागील अनेक वर्षांपासून रासपचे काम करणाऱ्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना या यादीत संधी मिळणार आहे.

Mahadev Jankar
Sharad Pawar: ऐन निवडणुकीत शरद पवारांनी जयंत पाटलांवर सोपवली मोठी जबाबदारी

रासपच्या संभाव्य उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे -

बारामती (जि. पुणे) - संदीप चोपडे

संदीप चोपडे हे बारामती (Baramati) रासपचे जिल्हाध्यक्ष राहीले असून ते पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आहेत.

इंदापूर (जि. पुणे) - तानाजी शिंगाडे (पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य.)

पाटण (जि. सातारा) - विठ्ठल यमकर

जत (जि. सांगली) - अजितकुमार पाटील

सांगोला (जि. सोलापूर) - आबा मोटे

अक्कलकोट (जि. सोलापूर) - सुनील बंडगर

पनवेल (जि. रायगड) - सुदाम जरग

परंडा (जि. धाराशिव) - नाना मदने

तुळजापूर (धाराशिव) - आश्रुबा कोळेकर

आष्टी पाटोदा (जि. बीड) - शिवाजी शेंडगे

राहुरी (जि. अहिल्यानगर) - नाना जुनधारे

अंबरनाथ (जि. ठाणे) - रूपेश थोरात

जिंतूर (जि. परभणी) - अशोक हाके

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com