Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

NCP News : '...म्हणून अजित पवार यांच्याकडे राज्याचं गृहखातं द्यावं!'; शरद पवार गटातील 'या' महिला नेत्याची सर्वात मोठी मागणी

NCP Sharad Pawar Leaders Demand : बदलापूर प्रकरणानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात गृहविभाग अपयशी ठरल्याचा आरोपही आता केला जात आहे. अनेकांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Jagdish Patil

NCP News : राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणे हे देवेंद्र फडणवीस यांचं काम नाही. आता उरलेले काही महिने गृहमंत्रीपद अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे द्या, ते उत्तमपणे सांभाळतील, अशी मागणी शरद पवार गटातील महिला नेत्याने केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या राज्यभरात बदलापूर (Badlapur) घटनेवरुन संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे राज्यात मुलींवरील अत्याच्याराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे पोलिस पीडित महिलांची तक्रार घेण्यासही टाळाटाळ करत असल्याचं उघडकीस आलं आहे.

याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी महायुती सरकारला घेरलं आहे. शिवाय राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात गृहविभाग अपयशी ठरल्याचा आरोपही आता केला जात आहे. अनेकांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) राजीनाम्याची मागणी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील फडणवीस हे पार्ट टाईम गृहमंत्री असल्याची बोचरी टीका केली आहे. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मात्र वेगळी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून गृहमंत्रीपद सांभाळणं हे देवेंद्र फडणवीसांचं काम नाही. आता उरलेले काही महिने गृहमंत्रीपद अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे द्यावे. ते उत्तमपणे सांभाळतील. ते कडक स्वभावाचे असून त्यांना ते चांगल जमेल किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्या ताब्यात गृहमंत्रालय घ्यावं, अशी मागणी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतानाच शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी अजितदादांबद्दल व्यक्त केलेल्या विश्वासामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT