Vijay Wadettiwar News : Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar News : विजय वडेट्टीवारांची दिल्लीत नवी सेटिंग; विधानपरिषदेतील विरोधी खुर्चीही ओढणार?

Congress News: काँग्रेसचा आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर डोळा?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर काँग्रेसला फायदाच फायदा झाला; विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा अजितदादांचा राजीनामा होताच काँग्रेसने संख्याबळ दाखवून या पदावर दावा ठोकला. त्यानंतर ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीत बसले.

हे पद आपल्याकडे येताच काँग्रेसने आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर डोळा ठेवला आहे. विरोधी नेता झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत गेलेल्या वडेट्टीवारांनी 'हायकमांड'सोबत चर्चा करून विधान परिषदेतील हे पद मिळवायचे, याची सेटिंग केल्याचे समजते.

विधान परिषदेमध्ये सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच आमदार मनीषा कायंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाल्याने अंबादास दानवे यांच्याकडे असलेले पद जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे विधान परिषदेतील राष्ट्रवादीची सध्या देखील कमी झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील दोन सदस्य अजितदादांसोबत गेल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सदस्य संख्या कमी झाली.

त्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची तुलना केल्यास काँग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य संख्या जास्त आहे. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर काँग्रेसचा डोळा असल्याचे बोलले जात आहे.

यातच विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या 'हाय कमांड'ची भेट घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत त्यांनी चर्चा केली.

यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाबद्दल खर्गे यांच्याशी वडेट्टीवारांची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत बोलताना त्यांनी स्वत:च "विधान परिषदेत आमची संख्या जास्त असली हे खरं असलं तरी याबाबतचा निर्णय हायकामंड घेतील", असे सूचक विधान माध्यमांशी बोलताना केल्याने आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT