Health Department Suspended Bhagwan Pawar Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar News: मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला! डॉ. पवारांच्या 'लेटर बॅाम्ब'नंतर वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

Health Department Suspended Bhagwan Pawar: अँब्युलन्स घोटाळ्यापासून अनेक विषयांवर आम्ही सरकारकडे जाब विचारला पण सरकार तिथे कारवाई करत नाही. प्रामाणिक अधिकारी या भ्रष्ट सरकारचा खरा चेहरा समोर आणत आहेत.

Mangesh Mahale

Bhagwan Pawar Suspended News, 26 May: ऑक्टोबर २०२३ मध्ये बदलीच्या विरोधात ‘मॅट’मध्ये जावून मंत्र्यांच्या आदेशाला आव्हान देणारे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्‍यांना त्रास देणे अशी प्रकरणे काढून निलंबन करण्यात आले आहे. डॉ. भगवान पवार (Bhagwan Pawar) यांच्या निलंबनानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे.

निलंबनानंतर पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या 'कारभाराची' पोलखोल केली आहे. डॉ. भगवान पवार यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी शिंदे सरकारला जाब विचारला आहे.

"या पत्राची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या टेंडरसाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी देऊ नये. तीस वर्ष प्रामाणिक सेवा देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर स्वतःच्या न्यायासाठी पत्र लिहायची वेळ यावी, ही घटना साक्ष देणारी आहे की राज्यात भ्रष्टाचारी सरकार आणि मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला आहे," अशा शब्दात वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला जाब विचारला आहे. वड्ट्टीवार यांनी एक्सवरून सरकारवर टीका केली आहे.

आरोग्य खाते हे लोकांच्या आयुष्याशी निगडित आहे, अँब्युलन्स घोटाळ्यापासून अनेक विषयांवर आम्ही सरकारकडे जाब विचारला पण सरकार तिथे कारवाई करत नाही. प्रामाणिक अधिकारी या भ्रष्ट सरकारचा खरा चेहरा समोर आणत आहेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"महायुती सरकारमध्ये फक्त टेंडर काढण्याची स्पर्धा असते. जे भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाने नियमबाह्य काम करतात त्यांचे पूर्ण लाड पुरवले जातात. जे नियमबाह्य काम करीत नाही त्यांचा महायुतीतील मुजोर आणि भ्रष्टमंत्री कसा छळ करतात त्याचा मोठा पुरावा समोर आला आहे. डॉ.भगवान पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निलंबन मागे घ्यावे म्हणून पत्र लिहिले आहे. मंत्र्यांनी त्यांना बोलवून वारंवार नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकला, ते काम केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई केली गेली," असा आरोप वडेट्टीवार यांनीही केला आहे.

काय आहे प्रकरण?

डॉ. पवार पुणे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा आऱोग्य अधिकारी म्हणून काम करत असताना एका महिला कर्मचार्‍याने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. आरोग्य खात्यामध्ये साहित्य खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला होता. यासर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आरोग्य विभागाला अहवाल दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पुणे महापालिकेत आरोग्य प्रमुख पदावर कार्यरत असताना पवार आणि सावंत यांच्यात अनेक वेळा खटके उडाल्याचे अनेकांना माहित आहे. चार महिन्यांमध्येच डॉ. पवार यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. पवार यांनी मॅटमध्ये जाऊन पुन्हा महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी राहण्याचे आदेश मॅटने दिला. त्यामुळे आरोग्य खात्यामधील वरिष्ठांची मर्जी डावल्याने जुनी प्रकरणे काढून निलंबन करण्यात आले असल्याची चर्चा आहे.

डॉ. भगवान पवार यांचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रात डॉ. भगवान पवार यांनी मोठा बॅाम्ब टाकला आहे. मंत्री महोदयांनी (तानाजी सावंत) मला कात्रज कार्यालयात बोलावून नियम बाह्य टेंडरची काम करण्यास सांगितली. त्यासोबतच इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला. पण मी नियम बाह्य काम केली नाहीत, म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे, असा आरोप डॉ.पवारांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT