Vijay Wadettiwar Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar News : 'मुंबई अदानीच्या घशात घातली जातेय', म्हणत वडेट्टीवारांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप!

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Monsoon Session 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी सध्या राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन महायुती सरकारच्या या कार्यकाळातील शेवटचं अधिवेशन आहे. शिवाय यानंतर विधानसभा निवडणूकही लागणार असल्याने याला विशेष महत्त्व आहे.

दरम्यान सभागृहात रोज विविध मुद्य्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद आणि गदारोळ होताना दिसत आहे. गुरुवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील जमिनींच्या मुद्य्यावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. मुंबईतील जमिनी अदानींच्या घशात घातल्या जात आहेत, असं त्यांनी सभागृहात म्हटलं

मुंबईच्या जमिनी सरसकट अदानीच्या घशात घातल्या जात आहेत. सरकारचा आशीर्वाद आणि सरकारचा सहभाग मुख्यमंत्र्यांपासून सर्वजण त्यात सहभागी आहेत. प्रचंड भ्रष्टाचार यामध्ये सुरू आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे. या जमिनी परत घ्या आणि अदानीकडे ही जी मुंबई गहाण ठेवण्याचा तुम्ही जो काही प्रयोग सुरू केला आहे, ते थांबवा अशी आम्ही आज मागणी केलेली आहे. अशी माहिती विरोधी पक्षनेते वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी मीडियाला दिली.

तर सभागृहात या मुद्य्यावर आक्रमकपणे बोलताना वडेट्टवार म्हणाले, 'मुंबई सगळी विकली जात आहे, बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे. मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत. दुग्ध विकास विभागाची जवळपास साडेआठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली गेली आहे. या जागेची किंमत 20 हजार कोटी रुपये आहे. हा कोणाचा पोशिंदा आहे, हा कोणाला किती पैसे देतोय?'

तसेच 'मुंबईला वाचावा, राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. या मुंबईला कोण वाचवणार? या धारावी प्रकल्पात आधी साडेपाचशे एकर जागा दिली. त्यानंतर एक हजार 203 एकर जागा दिली गेली. याशिवाय मिठागराचीही जागा दिली गेली. मुंबई वाचवा ही हात जोडून विनंती आहे. अदानी पूर्ण मुंबई साफ करतोय.'

दुग्ध विकास विभागाची अंदाजे 20 हजार कोटींची जमीन अदानीच्या घशात जाऊ देण्यास विरोध केला म्हणून सनदी अधिकारी तुकारम मुंढे यांची बदली केली गेली, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. शिवाय राज्य सरकारवर टीका करत, तुम्ही महाराष्ट्राला मूर्ख बनवत आहात का? तुकराम मुंढेंची बदली का केली गेली? त्याची नोट सभागृहासमोर आली पाहीजे. दम असेल तर उघड करा. या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार मी म्हणेण, लुटारू सरकार म्हणेण. असं वडेट्टीवारांनी बोलून दाखवलं आणि या संदर्भातील चौकशीचे आदेश द्या, अशी मागणीही यावेळी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT