Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंचा सेनापती कोण? ज्यांचं देवेंद्र फडणवीसांनी तोंडभरून कौतुक केलं...

Vidhan Parishad : विधान परिषदेतून सध्या महादेव जानकर, कपिल पाटील, विलास पोतनीस, भाई गिरकर, मनीषा कायंदे, रमेश पाटील, बाबाजानी दुर्राणी, नीलय नाईक, रामराव पाटील आणि वजाहत मिर्झा हे सदस्य निवृत्त होत आहेत.
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray Sarkarnama

Maharashtra Political News : लोकसभेनंतर राज्यात विधान परिषदेची निवडणूक लागली आहेत. आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडी झाल्या आहेत. तर १२ जुलै रोजी आमदारांतून विधान परिषदेचे सदस्य निवडीसाठी निवडणूक होणार आहे. त्या संबंधित ११ विधान परिषदेचे सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांचा सभागृहात निरोप समारंभ करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी उद्धव ठाकरे यांचे सेनापती असा उल्लेख करत तोंडभरून कौतुक केले.

अनिल परब Anil Parab हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून पुन्हा निवडून आलेले आहेत. त्यांच्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल परब हे आता पुन्हा एकदा निवडून आल्याने त्यांचे निरोपाऐवजी स्वागत करतो. ते पदवीधर मतदारसंघातून आमदार झाले असले तरी ते पदवीधरांसह राज्यातील सर्वच प्रश्न सभागृहात मांडतील, अशा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

मुंबईच्या सामाजिक, राजकीय वाटचालीमध्ये अनिल परब यांचा चांगला वाटा राहिलेला आहे. वेगवेगळ्या आंदोलनात, विविध क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. त्यातून सामाजिक प्रश्न कसे मार्गी लावायचे यात त्यांची हातोटी राहिली आहे. अनेक प्रश्नांची जाण आणि वकील असल्याने कायद्याचीही जाण त्यांना आहे. त्यांनी अनेकदा वकिलीचे डाव आमच्यावर टाकले आहेत, अशी मिश्किल टिपण्णीही फडणवीसांनी Devendra Fadnavis केली.

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
Pankaja Munde : महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण? पंकजा मुंडेंची आता सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या...

एक संसदपटू म्हणून त्यांची कायम आग्रहाची भूमिका मांडतात. हे करताना कुठे संयम ठेवावा, याचाही जाणा त्यांना आहे. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेचे एक प्रमुख सेनापती म्हणून अनिल परब यांच्याकडे पाहिले जाते, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करत अनिल परब यांचे विधान परिषदेत स्वागत केले.

विधान परिषदेतून सध्या महादेव जानकर, कपिल पाटील, विलास पोतनीस, भाई गिरकर, मनीषा कायंदे, रमेश पाटील, बाबाजानी दुर्राणी, नीलय नाईक, रामराव पाटील आणि वजाहत मिर्झा हे सदस्य निवृत्त होत आहेत. तर निरंजन डावखरे, अनिल परब, किशोर दराडे यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून पुन्हा आमदार झाले आहेत. तसेच शेकापचे जयंत पाटील आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव हे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
Firing @ Chandrapur : राज्यात पुन्हा गोळीबार; मनसेचा पदाधिकारी जखमी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com