Raj Thackeray, Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरेंचा 'मविआ'ला मोठा धक्का! 5 टर्म खासदारकी गाजवणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मनसे प्रवेश निश्चित?

MNS Vs Mahavikas Aghadi Vikramgad assembly election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला मात्र 'एकला चलो'चा नारा दिला आहे. तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील प्रमुख तीन पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

Jagdish Patil

Palghar News, 11 oct : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विधानसभेला मात्र 'एकला चलो'चा नारा दिला आहे. तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील प्रमुख तीन पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

मात्र, या युती-आघाड्यांमुळे दोन्हीकडील मित्र पक्षातील अनेक इच्छुकांची कोंडी झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाची ताकद आहे. शिवाय अनेक नेते विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, युती-आघाडी धर्मामुळे कोणत्यातरी एकाच पक्षाचं काम करण्याची नामुष्की या इच्छुकांवर आली आहे.

त्यामुळे युती-आघाडीतील अनेक नाराज इच्छुक आता आहे त्या पक्षात तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेत आहेत. याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बसत असल्याचं दिसत आहे. अशातच आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

कारण पालघर तालुक्यातील काँग्रेसचे दोन प्रमुख पदाधिकारी 13 ऑक्टोबर रोजी मनसेत (MNS) पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये पाच टर्म खासदार म्हणून निवडून आलेले दिवंगत दामू शिंगडा यांचे सुपुत्र सचिन शिंगडा यांचाही समावेश आहे.

दामू शिंगडा (Damu Shingda) हे काँग्रेसकडून त्यावेळच्या डहाणू लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शिवाय गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जात. तर आता त्यांचा सुपुत्र सचिन शिंगडा हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

मात्र, विक्रमगडचे विद्यमान आमदार सुनील भुसारा (Sunil Bhusara) हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आहेत. त्यामुळेमहाविकास आघाडीत ही जागा पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळेच सचिन शिंगडा यांनी मनसेत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

यासाठी त्यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली होती. सचिन शिंगडा यांनी 2014 ची पालघर लोकसभा मतदारसंघातून स्वबळावर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर ते पालघर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी असून त्यांनी काँग्रेसच्या युवक संघटनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष.

लोकसभा युवक काँग्रेस सरचिटणीस अशी विविध पदे सांभाळली आहेत. त्यांचा विक्रमगड भागात जनसंपर्क देखील दांडगा आहे, त्यामुळे त्यांनी मनसेतून ही जागा लढवल्यास काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT