Pune News: पुण्यात हिट अॅण्ड रन, ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हच्या घटना सतत वाढत आहेत. कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ अपघात प्रकरण ताजे आहे. यातच आणखी एका भीषण अपघातानं पुणे हादरलं आहे. कोरेगाव पार्क आणि मुंढवा रस्ता येथील गुगल बिल्डिंगच्या समोर एका आलिशान कारनं दुचाकीला धडक दिली आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
रौफ शेख, असं अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. तो एका कंपनीसाठी फूड डिलिव्हरी बॉयचं काम करच असल्याची माहिती मिळत आहे. रौफ शेख यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आयुष प्रदीप तयाल ( वय 34 ), असं अपघात करणाऱ्या कार चालकाचं नाव आहे. पोलिसांनी ( Police ) त्याला सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे ताब्यात घेतलं आहे.
कसा झाला अपघात?
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री 1.35 वाजण्याच्या सुमारास एका आलिशान कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तीनजण गंभीर जखमी झाले. नंतर याच कारनं रौफ शेख याच्या दुचाकीलाही पाठीमागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रौफला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, रूग्णालयात त्याला मृत घोषित केलं.
सीसीटीव्ही व्हिडिओ तपासल्यानंतर संबंधित कारचालक आयुष तयाल हा हडपसर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्याला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्यावर मुंढवा पोलिस ठाण्यात कलम 105, 281, 125 (अ), 132,119, 117, 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.