Thane Mulund Railway station News : ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील मूळ नाव ‘श्रीस्थानक’ हेच दिले जावे आणि देशातील पहिले रेल्वे स्टेशन या नात्याने ठाणे रेल्वे स्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले जावे, अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केल्या आहेत. त्यामुळे हे नवे स्थानक तयार होण्यापूर्वीच त्याच्या नावावरूनच राजकारण रंगतय की काय, अशीही चर्चा आहे.
माजी खासदार सहस्त्रबुद्धे यांच्या आग्रहावरून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी मंगळवारी ठाणे स्थानकाला समक्ष भेट देऊन प्रवाशी सोयी-सुविधांचा विस्तृत आढावा घेतला. त्यावेळी सहस्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांबरोबरच या महत्वाच्या मागण्याही केल्या. नवीन रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास, कल्याण-वाशी, ठाणे ते वाशीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे -वसई या लोकल सेवा सुरु कराव्यात, कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त विना आरक्षित डबा जोडण्यात यावा, अधिकाधिक मेल-एक्सप्रेस गाड्यांना जाता-येता ठाणे येथे थांबा द्यावा.
तसेच प्रत्येक फलाटावर सरकते जिने, स्थानकातील पूर्व-पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर-दक्षिण पूल निर्माण करणे आणि स्वछतागृहांसकट सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहांची रचना आणि नियमीत देखभाल इत्यादी महत्त्वाच्या मागण्या विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने केल्या. काही दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक खासदार राजन विचारे यांनी पाहणी दौरा केला होता. त्यानंतर, अशाप्रकारे आढावा घेत केलेल्या मागण्यावरून राजकारण केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रवासी संघटनेचे मिलिंद बल्लाळ तसेच नंदकुमार देशमुख, प्रदेश प्रवक्ते सुजय पतकी, सरचिटणीस विलास साठे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, नम्राता कोळी इत्यादींसह नीलेश कोळी, श्रुतिका मोरेकर, अमरीश ठाणेकर तसेच अन्य अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.