Uddhav Thackeray News : ...तर जरांगेंची 'चिवट'पणाने चौकशी करा! ठाकरेंचा रोख मुख्यमंत्र्यांचे विश्वासू चिवटेंवर?

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेच्या विजयाचा गुलाल उधळला गेला, तेव्हा मराठ्यांनी पहिला विजयाचा गुलाल मंगेश चिवटे यांच्या कपाळाला लावला. मराठा आंदोलकांनी मंगेश चिवटे यांना खांद्यावर घेऊन ठेका धरला.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलेले असतानाच मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.या अधिवेशनात मनोज जरांगेंवरुन सत्ताधारी -विरोधकांनी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.याचवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरांगेंची एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत.

याचवरुन आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधतानाच आता जरांगेंची 'चिवट'पणे चौकशी करावे अशी मागणी केली आहे. चिवटपणे म्हणताना त्यांचा रोख हे मनोज जरांगेच्या आंदोलनावेळी चर्चेत आलेले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 'ओएसडी' मंगेश चिवटेंवर होता की काय अशी चर्चा जोर धरु लागली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Transfer of Police Officers : साडेतीनशे पीएसआय, पीआयच्या इलेक्शन बदल्या; गुन्ह्यांच्या तपासाला लागणार ब्रेक?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता.27)अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर आता राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.उद्धव ठाकरेंनीही आजच्या अर्थसंकल्पावरुन महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली.ते म्हणाले,निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे. टेंडर मिळणारे कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि शेतकरी कोमात अशी अवस्था सध्या आहे. पहिल्या ज्या घोषणा होत्या त्याचं झालं ते आधी सरकारने स्पष्ट करावे.पुढील पाठ आणि मागील सपाट असा कारभार सरकारचा सुरु आहे.

उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगेंच्या एसआयटी चौकशीवरही भाष्य केले. ते म्हणाले, जरांगे पाटलांच काय चुकतंय ते सांगावं. त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवणार का असा सवाल उपस्थित करतानाच हे निर्घृण आहे असंही त्यांनी सांगितले. तसेच आम्ही जरांगे पाटलांच्या मागे आहोत असंही सरकारला ठणकावले.

जरांगे पाटलांची मागणी सोडून त्यांच्या मागे का लागतात. सरकारकडून आम्ही जरांगेंच्या मागे आहोत असा आरोप केला जात आहे, तसंही समजू, पण सगळ्यात पहिल्यांदा गुलाल कोणी उधळला?असा सवाल करत मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आणि जर एसआयटी नेमणार असाल तर या प्रकरणाची 'चिवट'पणाने चौकशीची मागणी करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटेंवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्याच्या पोलीस महासंचालक हुशार आहेत. त्यांच्याकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना कोणाचे कॉल येत होते याची यादी असेल.त्यांना खूप अनुभव आहे असा टोलाही ठाकरेंनी यावेळी डीजीपी रश्मी शुक्ला यांचे नाव न घेता लगावला.

बजेटमधून जनतेच्या पदरी निराशा आली आहे. 'कंत्राटदार जोमात, शेतकरी कोमात' असा आजचा अर्थसंकल्प आहे. शिवरायाचं स्मारक कधी होणार, याबाबत कुणी काही बोलत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजचे बजेट आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

जरांगेंचं आंदोलन थोपवण्यात चिवटेंची महत्त्वाची भूमिका

मंगेश चिवटे (Mangesh Chivate) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आहेत. आरोग्यनिधी गरजूपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी ते उत्तमरित्या सांभाळत आहेत.मराठा आरक्षणासंदर्भात मंगेश चिवटे यांनी सातत्याने मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला. त्यांचे शंका-निरसन करुन त्यांची भूमिका सरकारपर्यंत पोहोचवली. मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाच्यावेळी जरांगे यांच्याशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळात मंगेश चिवटे यांचा समावेश केला. मनोज जरांगेंशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळातील चेहरे प्रत्येकवेळी बदलले, पण मंगेश चिवटे कायम शिष्टमंडळात राहिले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Mahavikas Aghadi : जागावाटपाच्या बैठकीत चर्चेसाठी ‘वंचित’ पाठविणार आपला प्रतिनिधी

कोणतीही प्रसिद्धी न घेता, कोणतेही मीडिया बाईट न करता मंगेश चिवटे यांनी आपली भूमिका पार पाडली. मनोज जरांगेच्या विजयाचा गुलाल उधळला गेला, तेव्हा मराठ्यांनी पहिला विजयाचा गुलाल मंगेश चिवटे यांच्या कपाळाला लावला. मराठा आंदोलकांनी मंगेश चिवटे यांना खांद्यावर घेऊन ठेका धरला. तर अचानकपणे झालेल्या या आदरसत्काराने चिवटेही भारावून गेले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

(Edited By Deepak Kulkarni)

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Maharashtra Assembly Interim Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनातून काय मिळाले पुण्याला? पाहा यादी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com