Vinayak Mete Sarkarnama
मुंबई

‘विनायक मेटेंच्या गाडीचा ३ ऑगस्टलाही दोन गाड्यांनी पाठलाग केला होता’ : मृत्यूचं गूढ वाढलं

सुमारे तीन ते चार किलोमीटर ते आमच्या गाडीच्या मागंपुढं करत होते. त्या गाडीतील लोक काचा खाली करून आम्हाला पुढे या, असेही सांगत होते : शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याचा दावा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे रविवारी (ता. १४ ऑगस्ट) पहाटे मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर (Pune-Mumbai Express Way) अपघाती निधन झाले. अपघातानंतर तब्बल दोन तास त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांच्या चालकापासून नातेवाईकांपर्यंत सर्वांकडून होत आहे. आता शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडून नवीन माहिती पुढे आली आहे. मेटे यांच्या गाडीचा तीन ऑगस्ट रोजी पुण्याजवळ (Pune) शिक्रापूर परिसरात तीन ते चार किलोमीटरच्या अंतरात दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, असा दावा शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे. त्यामुळे मेटे यांचा अपघात आणि मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. (Vinayak Mete's car was chased by two cars near Pune on August 3 : Shiv Sangram's activist claims)

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला जात असताना माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. त्या अपघतातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे बीडसह राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे त्यांच्या मृत्यूबद्दल संशयही व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर १०० नंबरला फोन करूनही तब्बल दोन तास ॲम्ब्युलन्स आली नाही, असे मेटे यांच्या चालकानेही म्हटले हेाते. त्यातच शिवसंग्रामच्या आणखी एक कार्यकर्त्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना पुण्याजवळ मेटे यांच्या गाडीचा पाठलाग दोन गाड्यांनी केला हेाता, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे मेटे यांचा अपघात की घातपात ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर म्हणाले की, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्यासोबत मी ३ ऑगस्ट रोजी बीडहून पुण्याला निघालो होतो, त्यावेळी पुण्याजवळ रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास शिक्रापूर परिसरात दोन गाड्यांनी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. त्यात एक इर्टिका मोटार आणि दुसरा आयशर टेंपो होता. सुमारे तीन ते चार किलोमीटर ते आमच्या गाडीच्या मागंपुढं करत होते. त्या गाडीतील लोक काचा खाली करून आम्हाला पुढे या, असेही सांगत होते.

त्यावेळी मी मेटेसाहेबांना म्हटलंही होतं की, गाडी बाजूला घेऊन, ते कोण आहेत ते तरी आपण बघू. या दोन्ही गाड्या आपल्याला एवढं का पळवत आहेत. तेव्हा मेटेसाहेब म्हणाले होते की, ड्रायव्हर नशेत असेल म्हणून तो पाठलाग करत असेल. त्यामुळे आम्ही शांत बसलो, असेही मायकर यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT