Girija Raut Allegations : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या सुनेने अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. या आरोपांमुळे आता राऊतांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
आधीच राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक महिलांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच आता राऊतांची सून गिरीजा राऊत यांनी विनायक राऊत यांच्यासह त्यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत आणि संपूर्ण राऊत कुटुंबाने आपला छळ केल्याचा आरोप केला आहे.
गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात राऊत कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, राऊत कुटुंबियांकडून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.
त्यांना घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिलं जायचं, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. शिवाय त्यांच्या डोक्यावरील केस कापल्याचा धक्कादायक आरोपही गिरीजा यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विनायक राऊत त्यांचा मुलगा गितेश राऊत, पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राऊत कुटुंबासह 'फिरोज आणि काजी बाबा' नावाच्या दोन संशयित व्यक्तींवरबी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.