Dhangar Gangakhed Morcha: महेश बीडगर मारहाण प्रकरणाला राजकीय वळण; पहिल्यांदा पडळकरांचा फोन अन् आता गंगाखेडमध्ये धनगर समाजाचा मोर्चा

Mahesh Bidgar Crime Case: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात विलास घुले हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता धनगर चळवळीतील तरूण कार्यकर्ता महेश बीडगर यांना गंगाखेडमध्ये झालेल्या बेदम मारहाण प्रकरणावरुन धनगर समाज आक्रमक झाला आहे.
Gangakhed Dhangar Protest .jpg
Gangakhed Dhangar Protest .jpgSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात विलास घुले हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता धनगर चळवळीतील तरूण कार्यकर्ता महेश बीडगर यांना गंगाखेडमध्ये झालेल्या बेदम मारहाण प्रकरणावरुन धनगर समाज आक्रमक झाला आहे.

21 जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या धनगर आरक्षणाच्या मोर्चामध्ये पोलिसांशी वाद घालणाऱ्या समाज बांधवाना आवाहन करताना केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून त्याला जातीय रंग दिला गेल्याचा आरोप धनगर संघटनांनी केला आहे. महेश बीडगर यांना पोलिस स्टेशनमधून ओढून नेत मारहाण आणि खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ शनिवारी(ता.11 जुलै) गंगाखेडमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला.

महेश बीडगर यांना बेदम मारहाण करणाऱ्या, तसेच खोटा अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर तात्काळ अटक करून कारवाई करा, या मागणीसाठी गंगाखेडमध्ये हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी महेश बीडगर यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेत गंगाखेडच्या पोलीस निरीक्षकांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

महेश बीडगर यांनी मुंबई येथील 21 जानेवारीच्या धनगर आरक्षण मोर्चात कार्यकर्त्यांना आवरताना 'तुमचा हा आडमुठेपणा माळरानावर दाखवा' असे विधान केले होते. परंतु बीडकर याने 'महारांना दाखवा' असे म्हटल्याचा दावा करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. यावरून गंगाखेड शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काही तरूणांनी महेश बीडगर यांना बेदम मारहाण केली होती. मारहाण होत असताना महेश बीडगर यांनी शेजारीच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

Gangakhed Dhangar Protest .jpg
Baba Farzan News: 5 कोटींची कॅश, 21 लाखांचं सोनं, 8 लाखांची चांदी, 4 रायफल,2 पिस्तुलं, 500 जिवंत काडतुसे; 'डॉन'च्या घरी पोलिसांनी पहाटेच टाकली 'रेड'

पोलिसांनी प्रकरण समजावून घेत हा व्हिडिओ पाहिला, 'महार नाही तर माळरान' असा उल्लेख असल्याचे उपस्थित पोलीस उपनिरीक्षक व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संतप्त तरूणांची समजूत काढली. त्यानंतरही बीडगर यांना पोलीस ठाण्यातून ओढून नेत चौकात बेदम मारहाण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांना माहिती देतानाची त्यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.

मारहाणीनंतर रुग्णालयात दाखल झालेल्या महेश बीडगर यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु त्याऐवजी पोलिसांनी आपल्याविरोधातच ॲट्राॅसिटीची तक्रार दाखल करून घेत गुन्हा दाखल केला असेही महेश बीडगर यांनी या ऑडिओ क्लीपमध्ये सांगितले. दहा महिने आधीच्या व्हिडिओवरून महेश बीडगर यांना मारहाण करण्यात आल्यानंतर या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलं आहे.

Gangakhed Dhangar Protest .jpg
Hotel Owner Murder : श्रीरामपूर हादरलं! जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या वादातून माजी नगरसेवकाच्या मुलाची हॉटेलमध्ये निर्घृण हत्या

दरम्यान, महेश बीडगर यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून आता राजकीय वातवरण तापले आहे. आज गंगाखेड शहरात धनगर समाजाने मोठा मोर्चा काढत हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे. भाजपाचे परभणीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोऱ्हाडे व हजारो धनगर समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते.

पाच जणांवर गुन्हा दाखल

महेश बीडगर यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गंगाखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर त्याच दिवशी दुपारी महेश बीडगर यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड तालुक्यातील अकोली येथील रहिवासी महेश बीडगर यांना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ (ता.7) मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान चार जणांनी मारहाण केली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस स्टेशन येथे महेश बिडगर याच्या फिर्यादीवरून सुजित मस्के, अतुल साळवे, विलास साळवे व इतर एक जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Gangakhed Dhangar Protest .jpg
IPS News: मोठी बातमी: सात आयपीएस अधिकाऱ्यांनी सोडलं तडकाफडकी पद; राजीनाम्यामागं कोणाचा दबाव की वेगळं काही कारण?

तर महेश बिडगर यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी अतुल बबन साळवे यांना मंगळवारी (ता.7) दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी अतुल साळवे यांच्या फिर्यादीवरून महेश बीडगर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com