Rescue teams working at the Virar Narangi Fata building collapse site, where three lives were lost and many are feared trapped under the debris. Sarkarnama
मुंबई

Virar Building Collapse : ऐन गणेश चतुर्थी दिवशी मुंबईत मोठी इमारत दुर्घटना; चिमुकलीच्या पहिल्या वाढदिवसाची लगबग सुरू असतानाच मायलेकीचा दुर्दैवी अंत

Virar collapse latest update : देशभरात गणेश चतुर्थीची लगबग सुरू असताना विरारमधील नारंगी फाटा येथे मोठी इमारत दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इमारतीच्या कोसळलेल्या भागाखाली अद्याप 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 27 Aug : देशभरात गणेश चतुर्थीची लगबग सुरू असताना विरारमधील नारंगी फाटा येथे मोठी इमारत दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

तर इमारतीच्या कोसळलेल्या भागाखाली अद्याप 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या नारंगी फाटा येथील रामू कंम्पाऊडच्या स्वामी समर्थनगर येथील रमाबाई अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याचा एक भाग अचानक कोसळला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

तर वसईचे आमदार स्नेहा दुबे-पंडीत यांनी इमारतीत 20 ते 25 जण अडकल्याची शक्यता वर्तवली आहे. तर या इमारतीच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील मायलेकीचा मृत्यू झाला आहे. मृत चिमुकलीच्या पहिल्या वाढदिवशीच ही दुर्घटना झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

तर या मुलीचे वडील अद्याप ढिगाऱ्याखाली बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत चिमुकली जोयल कुटुंबातील असून तिचा पहिलाच वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त जोयल कुटुंबियांची तयारी सुरू होती.

मात्र, इमारतीचा भाग कोसळल्याने चिमुरडीचा वाढदिवशीच दुर्दैवी अंत झाला. दरम्यान, घटनास्थळी NDRF ची टीम आणि वसई विरार महापालिकेची अग्निशमन दलाची टिमकडून बचावकार्य सुरू आहे. तर मलब्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT