Maratha Reservation : जरांगेंच्या आंदोलनाआधीच आधी लातूर हादरलं? सरकारवर टीका अन् चिठ्ठी लिहून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Latur Youth Boy Try To Kill Himself For Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार मराठा आरक्षण देत नाही म्हणत पुन्हा एकदा आरक्षणाचा लढ्यास सुरूवात केली आहे. ते मुंबईत उपोषणाला बसणार असून बुधवारी मुंबईकडे कूच केली जाणार आहे.
Latur Baliram Mule And Manoj Jarange Patil
Latur Baliram Mule And Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. मनोज जरांगे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसणार आहेत.

  2. हजारो मराठा समाज मुंबईत आंदोलनासाठी धडकणार आहेत.

  3. लातूरमध्ये एका 35 वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

Latur News : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार केला आहे. ते येत्या 29 रोजी मुंबईवर धडकणार असून त्याआधीच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास बंदी घातली आहे. तरीही त्यांनी, काहीही झालं तरी मी मुंबईला जाणारच, असा पवित्रा जरांगे यांनी घेतलाय. मात्र त्याआधीच लातूर हादरले असून येथे एका तरूणाने विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने राज्यातील महायुती सरकारवर टीका करत चिठ्ठी लिहून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता असून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा केली आहे. पण उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदानासाठी नकार देत नवी मुंबई किंवा ठाणे परिसरात आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Latur Baliram Mule And Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : हायकोर्टाची मनोज जरांगेंना मुंबईत यायला मनाई; आता नवीन पर्याय कोणता? कोर्टाने काय सांगितले?

अशातच लातूरमध्ये धक्कादायक प्रकार उघकीस आला असून अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक गावातील बळीराम मुळे (वय 35) या तरूणाने विष पिवून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याच्यावर सध्या लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने याचे आता पडसाद उमटताना दिसत आहेत.

बळीराम या तरूणाने यावेळी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत सरकार फक्त वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे. त्याने महायुतीचे सरकार फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार चालढकल करत आहे. त्यामुळेच जरांगे पाटील यांना वारंवार उपोषण करावे लागत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहली आहे. ती त्याच्या खिशात सापडली आहे.

तसेच या चिठ्ठीत त्याने, महायुतीचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास असक्षम आहे. यामुळेच आपण आपल्या आयुष्याची अखेर करून घेत आहोत. सरकारने आतापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा संपवायला हवा होता. मात्र अद्याप या प्रश्नाचे घोंगडे भिजत ठेवले आहे. यामुळेच आपण हा पर्याय निवडत असल्याचेही त्याने आपल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

Latur Baliram Mule And Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Agitation: छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून मुंबईत जरांगेच्या आंदोलकांसाठी "एक भाकरी समाजासाठी" उपक्रम!

FAQs :

प्रश्न 1: मनोज जरांगे काय आंदोलन करणार आहेत?
उत्तर: ते 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार आहेत.

प्रश्न 2: लातूरमध्ये कोणती घटना घडली?
उत्तर: शिंदगी बुद्रुक गावातील एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

प्रश्न 3: या घटनेमुळे कोणती भीती व्यक्त होत आहे?
उत्तर: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटेल अशी भीती व्यक्त होते आहे.

प्रश्न 4: आंदोलन कुठून सुरू होणार आहे?
उत्तर: आंतरवली सराटी येथून जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

प्रश्न 5: आंदोलनात किती लोक सहभागी होणार आहेत?
उत्तर: हजारो मराठा समाज मुंबईत धडकणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com