jayant patil | vishal patil  sarkarnama
मुंबई

Vishal Patil On Jayant Patil : "जयंत पाटील महाविकास आघाडीसोबत असल्यानं सेफ"; विशाल पाटील असं का म्हणाले?

Vishal Patil News : जयंत पाटील यांचा एकदा फोन आला होता. त्याबद्दल मी विश्वजीत कदम यांना माहिती दिली होती. पण...

Akshay Sabale

संजयकाका पाटील यांचा दिलदार शत्रू जगाला माहिती आहे. तो आजचा नाही. संजयकाका पाटील ( Sanjaykaka Patil ) आणि भाजपची एन्ट्री दिलदार शत्रूमुळे झाली आहे.

भाजपला सांगलीत वाढवण्याचं आणि आमच्याविरोधात शक्ती देऊन काँग्रेसचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांनी केलं आहे, असं म्हणत काँग्रेसला पाठिंबा दिलेले खासदार विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते एका यूट्यूब चॅनेलशी संवाद साधत होते.

लोकसभा निवडणुकीवेळी जयंत पाटलांशी ( Jayant Patil ) बोलणं झालं का? या प्रश्नावर विशाल पाटील म्हणाले, "मी स्वत: त्यांच्याशी किंवा शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधला नाही. आमचे शरद पवार यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. निवडणुकीच्याकाळात वसंतदादा शुगर येथे आमच्या बैठका होत होत्या. पण, कोणतीही चर्चा करताना आधी पक्षातील नेत्यांशी केली पाहिजे. मग, ते शरद पवार यांच्याशी चर्चा करतील, असा प्रोटोकॉल आम्ही पाळलेला आहे."

"जयंत पाटील यांचा एकदा फोन आला होता. त्याबद्दल मी विश्वजीत कदम यांना माहिती दिली होती. पण, त्यांच्या ( जयंत पाटील ) यांच्या बोलण्यात एवढा कॉन्फिडन्स जाणवत नव्हता," असं विशाल पाटलांनी ( Vishal patil ) सांगितलं.

"मी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षात नाही. माझ्यावर बंधने कमी आहेत. विश्वजीत कदम यांच्यावर बंधने आहेत. मी उघडपणे त्यांच्यावर ( जयंत पाटील ) बोलू आणि विरोधात काम करू शकतो. पण, भाजपचा पराभव झाला पाहिजे, ही माझी प्राथमिकता आहे. कुणाची तरी जिरवायची आणि कुणाचा तरी बदला घ्यायचा हे पाप आमच्याकडून कधीच घडणार नाही. त्यामुळे ते महाविकास आघाडीसोबत असल्यानं सेफ राहतील,"

लोकसभा निवडणुकीत चौथे 'पाटील' सुद्धा होते. त्यात कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामी आला, असं विधान संजयकाका पाटील यांनी केलं होतं. हा दिलदार शत्रू कोण आहे? या प्रश्नावर विशाल पाटील म्हणाले, "संजयकाका पाटलांचा दिलदार शत्रू जगाला माहिती आहे. संजयकाका पाटील आणि भाजपची सांगलीत एन्ट्री दिलदार शत्रूमुळे झाली आहे. सांगलीत भाजपला वाढवण्याचं आणि आमच्याविरोधात शक्ती देऊन काँग्रेसचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांनी ( जयंत पाटील ) केलं आहे."

"आमचा किंवा आमच्या वडिलांचा हा स्वभाव नाही. आघाडीतील व्यक्तीला त्रास देण्याचे संस्कार आमच्यात नाहीत. कधी-कधी वाटतं ते शिकावं. पण, कुणाचा तरी राग आणि बदला घ्यावा ती भावना आमच्यात नाही. असं करताना भाजपसारख्या शक्तिला मोठं करणं आमच्याकडून घडलं नाही. ते आमच्या मतदारसंघात घडलं. हे कुणी केलं त्याचं नाव घेण्याची गरज नाही. कारण, लहान मुलाला जरी विचारलं तरी तोही तुम्हाला सांगेन हे षडयंत्र कोणी रचलं होतं," असं म्हणत विशाल पाटलांनी जयंत पाटलांना लक्ष्य केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT