Election sarkarnama
मुंबई

Voter Registration Pune : युवामतदारांचा नोंदणीला उत्तम प्रतिसाद ; एकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी

सरकारनामा ब्युरो

Voter Registration : देशपातळीवरील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ काही दिवसापूर्वी पुण्यात झाला.पूर्वी १ जानेवारीनंतर १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज केल्यानंतर एक वर्ष वाट पाहवी लागत होती.

नवीन सुधारणेमुळे एक जानेवारी नंतरही वय वर्ष १८ पूर्ण झाल्यानंतर अर्ज केल्यानंतर एक एप्रिल रोजीच्या मतदा यादीत त्यांचे नाव समाविष्ट होणार आहे. एवढेच नव्हे, ज्या दिवशी १८ वय वर्ष पूर्ण होणार आहे, त्या आधी अर्ज केल्यानंतर ही त्या दिवशांच्या नंतर येणाऱ्या तारखेला त्यांच्या नावाचा समावेश मतदार यादीत होणार आहे

नवमतदारांना आता मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही. कारण भारतीय निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी नियमात केलेल्या सुधारणांमुळे १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर असे मतदार नोंदणी पात्रता (अर्हता) दिनांक उपलब्ध झाले आहेत. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार, तसेच आगाऊ मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर करू शकणार आहेत.

नवमतदारांना मतदार नोंदणीसाठीव मतदानाच्या हक्काविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहेत.

पुणे जिल्ह्यात १७ व १८ वर्षावरील पात्र युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युवा वर्गाला मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करुन मतदानाच्या हक्काविषयी जागरुक करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघा अंतर्गत ४४२ महाविद्यालयांमध्ये मेगा शिबिर आयोजित करण्यात आले होते. नवमतदारांनी नमुना क्रमांक ६ चा अर्ज भरून शिबिरास चांगला प्रतिसाद दिला.

पुणे जिल्ह्यात युवा नवमतदार नोंदणीसाठी ४४२ महाविद्यालयांमध्ये एकाचवेळी घेण्यात आलेल्या विशेष शिबिरांमध्ये ३१ हजार ६४७ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. पुणे जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार यादीत एकूण ७८ लाख ७६ हजार ९५० मतदार समाविष्ट आहेत. सध्या छायाचित्र मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु असून, आठ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.

५ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सर्व पात्र युवामतदारांना महाविद्यालयातील विशेष शिबिरात नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. अद्याप नोंदणी न झालेल्या नवमतदारांसाठी ही मोठी संधी असल्याचे डॅा. देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT