Thane : मतदार यादी जितकी सर्व समावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रियेत सहभाग शक्यता वाढते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समूहातील 27 हजार 463 मतदार पहिल्यांदाच मतदार राजा म्हणून मतदानाचा हक्क बजावणार आहे. तसेच अंतिम मतदार यादीत 48 हजार 631 मतदारांची निव्वळ वाढ झाल्याने एकूण मतदारांची संख्या ही 63 लाख 92 हजार 520 इतकी झाली आहे. यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झाल्याने मतदार यादीतील स्त्री- पुरुष गुणोत्तर 848 वरून 853 इतके झाले आहे.
27 आॅक्टोबर 2023 च्या प्रारुप मतदार यादीत 1 लाख 77 हजार 078 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 1 लाख 28 हजार 447 मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार (Voter) यादीत 48 हजार 631 मतदारांची निव्वळ वाढ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली अंतिम मतदार प्रसिद्ध होत असतांना 18 हजार 785 पुरुष मतदारांची आणि 31 हजार 715 स्त्री मतदारांची व 131 तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. तर पुर्नरिक्षण कार्यक्रमात 18 ते 19 वयोगटातील 39 हजार 590 मतदारांची नव्याने भर पडली आहे.
20 ते 29 वयोगटात 43 हजार 889 मतदारांची वाढ झाली आहे. प्रारुप मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 30 हजार 130 (0.31 टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत 69 हजार 720 (1.09 टक्के) इतकी झाली. तर 20 ते 29 वयोगटातील प्रारुप यादीतील मतदार संख्या 9 लाख 79 हजार 153 (10.04 टक्के) होती, ती अंतिम यादीत 10 लाख 23 हजार 42 (16 टक्के) इतकी झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या सर्व्हेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही देखील करण्यात आली आहे. त्यानुसार 47 हजार 709 मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. पैकी 80 पेक्षा अधिक वय असलेले 18 हजार 813 मतदार मृत किंवा वयात सुधारणा असलेल्यांची नावेही वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मतदार यांद्यामध्ये 1 लाख 50 हजार छायाचित्र समान नोंदी असल्याचे निर्दशनास आले. त्यांची सखोल तपासणी करुन विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कालावधीत 48 हजार 354 मतदारांची नावेही वगळण्यात आली.
इतर काही तपशील समान असलेले लोकसंख्या शास्त्रीयदृष्टया समान नोंदी 27 हजार 93 मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करुन 9 हजार 19 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे कार्यालयामार्फत मतदार राजा जागा हो मतदानासाठी सज्ज हो हे अभियान राबविणार येणार आहे.
ठाणे जिल्ह्यात 6 हजार 524 मतदान केंद्र सज्ज केली आहेत. त्यातील मुरबाड मध्ये सर्वात मोठे मतदान केंद्र असून त्याची संख्या 511 आहे. तर सर्वात कमी मतदान केंद्राची संख्या उल्हासनगरमध्ये असून ती 211 एवढी आहे. तसेच यापुढे एकही मतदान केंद्र हे पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असणार नसून सर्व केंद्र ही तळमजल्यावर असणार आहेत. याशिवाय सुशिक्षित मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी आता मोठ मोठ्या गृहसंकुलांच्या ठिकाणीच मतदान केंद्राची निर्मिती केली जाणार असून त्याची संख्या 34 एवढी आहे. तर 80 वयोगटापुढे असलेल्या वृध्द नागरीकांना जे आजारी असतील, अंथरुणाला खिळून असतील अशा नागरीकांनी मतदान करायचे आहे असे सांगितल्यास त्यांच्या होम वोटिंग उपलब्ध करून दिली जाणार आहे. असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.