Nitesh Rane News : तृतीयपंथी समाजाविषयी केलेल्या विधानावर राणे ठाम ; बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा दिला संदर्भ..

Maharashtra Politics : "काँग्रेसच्या समोर झुकणारे सगळे हिजडे असतात"
Nitesh Rane & Uddhav Thakre
Nitesh Rane & Uddhav ThakreSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : तृतीयपंथी समाजाविषयी आमदार नितेश राणे यांनी काल एका ठिकाणी अवमानकारक विधान केले आहे. या विधानाचा निषेध करत पुण्यात बंडगार्डन पोलीस स्थानकासमोर तृतीय पंथीयांनी बुधवारी रस्ता रोको आंदोलन केले.

या अवमानकारक वक्तव्यावरुन राणे विरोधात तृतीयपंथी समाज आक्रमक झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावर राणेंनी आज (बुधवार) स्पष्टीकरण दिलं.

Nitesh Rane & Uddhav Thakre
MNS Campaign Ek Sahi Santapachi : 'मनसे' च्या 'संतापा' वर राष्ट्रवादी-शिवसेनेची स्वाक्षरी ; राजकीय घडामोडींबाबत राग..

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना नितेश राणेंनी असंस्कृत भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हिजड्यांचा प्रमुख असा केला आहे. यावरून आता राजकारण पेटलं आहे. यावर स्पष्टीकरणं देताना राणेंना आपल्या विधानावर ठाम असल्याचे दिसते.

"तृतीयपंथी समाजाने माझं पूर्ण म्हणणं ऐकलंच नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्याच्या एका सभेत याबाबतचे विधान केले आहे. तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर आहे. त्या भाषणात बाळासाहेबांनी "काँग्रेसच्या समोर झुकणारे सगळे हिजडे असतात,"असा म्हटलं आहे. तोच संदर्भ घेऊन मी बोललो," असे राणे म्हणाले.

Nitesh Rane & Uddhav Thakre
ED Director Sanjay Mishra : सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला दणका ; ED संचालकांचा कार्यकाळ रोखला..

"माझे विधान हे राजकीय आहे, ते समजून घ्यावं. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही, असे राणे यांनी नमूद केलं.

नितेश राणे यांनी केलेल्या टि्वट वरुन तृतीयपंथीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तृतीयपंथीय समाजातील काहींनी राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. पोलीस राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास देखील टाळाटाळ करत असल्याचा आरोप तृतीयपंथी हक्क अधिकार संषर्ष समितीच्या राज्य समन्वयक शमिभा पाटील यांनी केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com