Gram Panchayat election
Gram Panchayat election sarkarnama
मुंबई

Gram Panchayat Election 2022 : १ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु ; थेट सरपंचपदासाठीही आज मतदान

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातल्या १८ जिल्ह्यांमधल्या १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या (gram panchayat)सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे. मतमोजणी उद्या (सोमवारी) होणार आहे. . (gram panchayat 2022 news update)

१८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यात मतदान होणार असून थेट सरपंचपदासाठीही आज मतदान होणार आहे. सायंकाळी पाच पाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येणार आहे

यावेळेस ग्रामपंचायतीच्या संरपचाचींसुद्धा थेट जनतेमधून निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या मतदानाचा निकाल १७ ऑक्टोबर रोजी हाती येणार आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील १ हजार १६५ ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान होत आहे.

या ठिकाणी आज होत आहे मतदान

पुणे – मुळशी- 1 व मावळ- 1.

सातारा – जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.

कोल्हापूर – भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.

अमरावती – चिखलदरा- 1.

वाशीम – वाशीम- 1.

ठाणे – कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79.

पालघर – डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70 ( पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 711 सदस्य बिनविरोध तर १० सरपंच बिनविरोध आलेत, तर जिल्ह्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध आहेत )

रायगड – अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.

रत्नागिरी – मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.

सिंधुदुर्ग – दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. नाशिक:

इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71.

नंदुरबार – अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.

गोंदिया – देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2.

गडचिरोली – चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1.

नागपूर – रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.

वर्धा – वर्धा- 2 व आर्वी- 7.

चंद्रपूर –भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1.

भंडारा – तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT