Mumbai News : सत्तेत येण्यासाठी गेमचेंजर ठरलेली वैयक्तिक लाभाची माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारला आता डोकेदुखी ठरू लागली आहे. महायुती सरकारला आता ही योजना परवडेनाशी झाली आहे.
राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थींच्या पडताळणीचे, फेरसर्वेक्षणाचा घाट महायुती सरकारने घातला आहे. या योजनेतील फेरसर्वेक्षण सुरू केले असून, ती अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी दिली आहे. पण राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध सुरू केला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बोलबाला होता. महायुतीमधील प्रमुख देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार लाडकीचे कौतुक करताना, राज्य ढवळून काढले. याच लाडक्या बहिणींना महायुतीला पुन्हा सत्तेत बसवले. लडक्यांचे लाड पुरवताना आता महायुती सरकारची दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे लाडक्या योजनेचा लाभ घेणार्या लाभार्थींच्या अर्जांची पडताळणी आणि फेरसर्वेक्षण सुरू केले आहे.
सत्तेत येण्यापूर्वी महायुती सरकारने सरसकट या योजनेचा लाभ दिला होता. महायुतीची (Mahayuti) राज्यात सत्ता आहे. राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आल्याने सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची आयकर विभाग आणि परिवहन विभागाकडून पडताळणी सुरू आहे. या योजनेच्या फेर सर्वेक्षणाचा आदेश देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
अंगणवाडी सेविकांनी मात्र फेरसर्वेक्षला नकार देण्यास सुरवात केली आहे. वर्धा जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांना जिल्हा परिषदेवर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. त्यात माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फेरसर्वेक्षणाला विरोध केला आहे. राज्यात तब्बल दोन लाखांवर अंगणवाडी सेविका आहे. त्या सर्वांचा सरकारच्या फेरसर्वेक्षणाच्या आदेशाला विरोध आहे.
लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची निवड करताना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. आता त्यांनाच फेरसर्वेक्षणाचा आदेश काढला आहे. ज्यांच्या घरी कार, दुचाकी आणि चार एकर शेती आहे, अशा लाभार्थ्यांची माहिती गोळा करा, असे आदेशात म्हटले आहे. निवड केलेल्या लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणानंतर लाभापासून वंचित केले, तर गावकऱ्यांचा रोष होईल आणि वाद निर्माण होतील, यातूनच अंगणवाडी सेविकांचा विरोध आहे.
राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांनी ही भूमिका घेतल्याने महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली ही योजना चांगलीच डोकेदुखी ठरू लागली आहे. यातच योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीनुसार लाभार्थ्यांची संख्या दररोज कमी होत आहे. विरोधकांनी मात्र, लडक्यांना कोण कसे पैसे देत नाही, हेच पाहू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे भविष्यात या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन माजणार यात काही शंका नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.