Supriya Sule  Sarkarnama
मुंबई

Supriya Sule on Shivsena: करोडोंची जाहिरात देणारा हितचिंतक भेटतोय का?, मी आणि अजितदादा शोधतोय..: सुळेंचा शिंदे गटावर निशाणा

Maharashtra Politics: पक्ष आणि सत्तेत असणारे नेते जर जाहिरातबाजीत अडकत असतील तर राज्याचं काम कुठल्या दिशेने सुरु आहे

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule Criticized State Government: वृत्तपत्रांमध्ये करोडो रुपयांची फुल पेज जाहिरात देणारे हितचिंतक कोण आहेत ते आम्ही शोधत आहोत. मीही शोधत आहे आणि दादाही असे करोडो रुपयांची जाहिरात देणारे हिंतचिंतक भेटतात का ते शोधायला सांगितलं आहे. दादा जळगावला गेले आहेत आणि मी पुण्यात होते शोधत होते. पण आम्हाला तर अजून असे हितचिंतक भेटले नाहीत, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्य सरकारला टोला लगावला आहे. (We are also looking for well-wishers who will give crores of advertising)

असे हितचिंतक कोण आहेत. जर असे करोडो रुपये खर्च करणारे हितचिंतक तुम्हाला भेटले तर माझा, दादाचा किंवा जयंत पाटील यांचा नंबर द्या, अशी मिश्लिक टिपण्णीही त्यांनी यावेळी केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली आहे. ( Shivsena Advertisement)

हे हास्यास्पद असलं तरी, जर विचार केला तर पक्ष आणि सत्तेत असणारे नेते जर जाहिरातबाजीत अडकत असतील तर राज्याचं काम कुठल्या दिशेने सुरु आहे. सगळे तू-तू मैं-मैं मध्ये अडकले आहेत. तु काय म्हणला, मी काय म्हणालो, तु कोणाचा अपमान केला, मी तुला कसं खाली दाखवतो, मी तुला कॅबिनेटमधून कसं ड्रॉप करतो , यातच जर ते अडकले असतील... असं जर सुरु असेल तर महाराष्ट्रात कामंच थांबल आहे. कारण बाकीच्या कामांमध्येच सगळे व्यस्त आहेत. (Maharashtra Politics)

यावेळी त्यांना त्यांच्या कार्याध्यक्ष पदाच्या कार्याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या की, कामाचं विभाजन पूर्णपणे झालं आहे. माझा मतदारसंघ हा महाराष्ट्राचा आहे, अर्थातच इथे संघटनेची जबाबदारी माझी आहे, इथल्या आणि दिल्लीतल्या कामाचं विभाजन झालं आहे. दिल्लीतील लोकसभा माझ्याकडे आणि प्रफुल्ल भाईंकडे राज्यसभा, असं क्लिअरकट कामाचं विभाजन झालं आहे. मला लोकसभेचीही जबाबदारी दिली असल्याचंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT